13 December 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL शेअर पुन्हा एकदा फोकसमध्ये, फायद्याची अपडेट नोट करा

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल म्हणजेच भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स सोमवारी ट्रेडिंग दरम्यान फोकसमध्ये आले होते. दरम्यान हा स्टॉक 302.70 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहचला होता. नुकताच बीएचईएल कंपनीला दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. ( भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी अंश )

झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात स्थापन होणाऱ्या कोळसा आधारित प्रकल्पासाठी बीएचईएल कंपनीने बोली लावली होती. आज मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 0.52 टक्के घसरणीसह 297.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

DVC चा हा पहिला 800 MW क्षमतेचा प्रकल्प आहे. हा प्रोजेक्ट बीएचईएल कंपनीद्वारे EPC तत्त्वावर स्थापन केला जाणार आहे. DVC चे झारखंड आणि पश्चिम बंगालमधील 80 टक्क्यांपेक्षा अधिक कोळसा आधारित वीज केंद्रे बीएचईएल कंपनीने स्थापन केले आहेत. या प्रकल्पासाठी बीएचईएल कंपनीला सिव्हिल कामासह उपकरणे पुरवठा, प्रकल्प उभारणी आणि चालू करणे यासारखी कामे करायची आहेत. या प्रकल्पासाठी प्रमुख उपकरणे बीएचईएल कंपनीच्या हरिद्वार, त्रिची, बेंगळुरू, हैदराबाद, भोपाळ आणि राणीपेठ उत्पादन केंद्रात बनवली जाणार आहेत.

बीएचईएल कंपनीने संपूर्ण देशात 1,68,000 MW पेक्षा जास्त क्षमतेचे थर्मल पॉवर प्लांट बसवलेले आहेत. ही कंपनी भारतातील आघाडीची वीज उपकरणे उत्पादन करणारी कंपनी मानली जाते. या कंपनीमध्ये LIC ने 7.33 टक्के म्हणजेच 25,53,89,940 शेअर्स धारण केले आहेत. मागील एका वर्षात बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात बीएचईएल स्टॉक 55 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1,03,939.59 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 13 August 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x