26 April 2024 5:08 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

Money From IPO | IPO देत आहेत वेगाने पैसा, या शेअरच्या लिस्टिंगवेळीच गुंतवणुकदार मालामाल, पुढेही खरेदी करावा?

Money from IPO

Money From IPO | DCX Systems कंपनीच्या शेअर्सनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी BSE आणि NSE इंडेक्सवर शानदार एंट्री केली आहे. IPO लिस्टिंगच्या दिवशी या कंपनीचे शेअर्स प्रिमियम किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 289.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. या स्टॉकची लिस्टिंग किंमत त्याच्या इश्यू किमतीच्या 39.66 टक्के अधिक होती. त्याच वेळी, एनएसईवर डीसीएक्स सिस्टीम्स कंपनीच्या शेअर्सची किंमत 287 रुपयांवर क्लोज झाली होती. इश्यू किमतीपेक्षा शेअरची किंमत 80 रुपयांनी अधिक वधारली होती. एका दिवसात स्टॉक 38.65 टक्के वाढीसह ट्रेड करत होता. DCX Systems कंपनीचा IPO मध्ये प्राइस बँड 197-207 रुपये प्रति शेअर दरम्यान जाहीर करण्यात आला होता. सूचीबद्ध झाल्यानंतर काही तासातच या कंपनीचे शेअर्स 45 टक्के वाढीसह 305 रुपये किमतीवर पोहोचले होते. हा स्टॉक इश्यू 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2022 या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

IPO ला मिळाला होता प्रचंड प्रतिसाद :
DCX Systems कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. NSE च्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार शेवटच्या दिवशी बुधवारी DCX कंपनीच्या IPO चे 69.79 पट अधिक सबस्क्रिप्शन झाले होते. या IPO मध्ये जरी करण्यात आलेल्या 1.45 कोटी शेअर्सच्या तुलनेत 101.27 कोटी शेअर्ससाठी बोली प्राप्त झाली होती. DCX Systems कंपनीच्या IPO मध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 84.32 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. त्याच वेळी, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 61.77 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 43.97 पट सबस्क्राईब झाला होता.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला :
या IPO मध्ये शेअर्स प्राप्त झालेल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना DCX कंपनीचे समभाग होल्ड करून ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कंपनीसाठी भारतात संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात अनेक वाढत्या संधी उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत DCX कंपनीला अधिक काम करण्याची विशेष संधी मिळेल आणि कंपनी पुढील काळात जबरदस्त कामगिरी करेल. गुंतवणूकदार DCX सिस्टम्स या कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन दृष्टीकोन समोर ठेवून होल्ड करून ठेवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| DCX System IPO has been listed on stock market and investors has earned huge money from IPO on 12 November 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x