13 December 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
x

Dhani Services Share Price | अबब! उच्चांक किंमतीवरून 90 टक्के घसरलेला शेअर 5 दिवसात 65 टक्के वाढला, खरेदी करावा का?

Dhani Services Share Price

Dhani Services Share Price | वित्त पुरवठा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. मागील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 65 टक्के मजबूत झाले आहेत. मागील काही महिन्यांपासून ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता. धानी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मागील दोन वर्षांत 362 रुपयांवरून घसरुन 23.62 रुपयांवर आले आहेत. ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 90 टक्के कमजोर झाले आहेत. ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 73.85 रुपये होती. (Dhani Services Limited)

5 दिवसात बंपर वाढ :
मागील 5 दिवसात ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स तब्बल 65 टक्के वधारले आहेत. 29 मार्च 2023 रोजी ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 25.21 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर गुरूवार दिनाक 6 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये 41.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअर्सची किंमत 29 टक्के वधारली आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 2440 कोटी रुपये आहे.

शेअरची कामगिरी :
‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील दोन वर्षांपासून सातत्याने घसरत आहेत. 26 फेब्रुवारी 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 362.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते 28 मार्च 2023 रोजी धानी सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स घसरुन 23.62 रुपये किमतीवर पोहोचले होते. ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 23.60 रुपये होती. मागील दोन वर्षांत ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स 90 टक्के कमजोर झाले आहेत. धानी सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 791.25 रुपये होती. मागील 5 वर्षात ‘धानी सर्व्हिसेस’ कंपनीचे 86 टक्के कमजोर झाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Dhani Services Share Price on 07 April 2023.

हॅशटॅग्स

Dhani Services Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x