
GTL Infra Share Price | सध्या शेअर बाजारात जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र स्मॉल कॅप स्टॉक तेजीत वाढत आहेत. असे काही शेअर्स आहेत, ज्यांची किंमत 1.25 रुपये पेक्षा कमी आहे, मात्र त्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये Idea Vodafone, इन्फिबीम अॅव्हेन्यूज यासारखे शेअर्स देखील आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये GTL इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, SJVN, Infibeam Avenues कंपनीचे शेअर्स 16 टक्के वाढीसह ट्रेड करत होते.
Infibeam Avenues शेअर्स
Infibeam Avenues कंपनीचे शेअर्स 16.55 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि काही मिनिटात हा स्टॉक 18.65 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 20.35 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 12.85 रुपये होती. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.19 टक्के घसरणीसह 16.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
व्होडाफोन आयडिया शेअर्स
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये व्होडाफोन आयडिया कंपनीचे शेअर्स 7.62 टक्क्यांच्या वाढीसह 11.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअरची नीचांक पातळी किंमत 5.70 रुपये होती. आता हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या दुप्पट झाला आहे. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.08 टक्के घसरणीसह 10.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
GTL Infra शेअर्स
GTL Infra कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 9.52 टक्क्यांच्या वाढीसह 1.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मार्केट ओपन होताच बा स्टॉक 9 टक्के वाढीसह 1.15 रुपये किमतीवर पोहचला होता. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत फक्त 60 पैसे होती. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.70 टक्के घसरणीसह 1.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
SJVN शेअर्स
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये SJVN कंपनीचे शेअर्स 15 टक्क्यांच्या वाढीसह 73.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. नुकताच या कंपनीने भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळासोबत SJVN ग्रीन एनर्जी कंपनीद्वारे वीज खरेदी करार केला. आज मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.27 टक्के घसरणीसह 70.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.