14 December 2024 3:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर Post Office Scheme | बंपर रिटर्न मिळवून देणाऱ्या पोस्टाच्या धमाकेदार योजना; जाणून घ्या आणि आजपासूनच बचत करा
x

HAL Share Price | HAL शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा

HAL Share Price

HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील दोन दिवसांत 9 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. शुक्रवारी देखील या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 19 जुलै रोजी हा स्टॉक 4.29 टक्क्यांच्या घसरणीसह 4800 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. नुकताच एचएएल कंपनीने स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, त्यांनी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीसोबत सुधारित एमओयूवर स्वाक्षरी केली आहे. हा एमओयू LCA AF Mk-2 शी संबंधित आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )

ब्रोकरेज फर्म इनक्रेडने एचएएल स्टॉक मूल्यांकनाबाबत चिंता व्यक्त केली होती. ब्रोकरेज फर्मने एचएएल कंपनीची तुलना दसॉल्ट एव्हिएशन सोबत करून एक सविस्तर अहवाल प्रकाशित केला होता. मागील आर्थिक वर्षात दसॉल्ट एव्हिएशन कंपनीने 519 दशलक्ष डॉलर्स महसूल आणि 974 दशलक्ष डॉलर्स नफा कमावला होता. एचएएल कंपनीने 367 दशलक्ष डॉलर्स महसूल आणि 921 दशलक्ष डॉलर्स नफा कमावला होता. सध्या एचएएल कंपनीचे शेअर्स 4100 कोटी डॉलर्स एंटरप्राइझ मूल्यावर पोहचले आहेत. तर Dassault Aviation कंपनीच्या शेअर्सचे मूल्य 670 कोटी डॉलर्सवर आले आहे.

तज्ञांच्या मते, पुढील दोन वर्षांमध्ये Dassault Aviation कंपनीची महसूल कमाई 24 टक्के चक्रवाढ दराने आणि नफा 12 टक्के चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. तर एचएएल कंपनीचा महसूल 13 टक्के सीएजीआर आणि नफा 8 टक्के सीएजीआर दराने वाढण्याची अपेक्षा आहे . 2023 मध्ये दसॉल्ट एव्हिएशन कंपनीचे ऑर्डर बॅकलॉग 4100 कोटी डॉलर्स नोंदवले गेले होते. तर एचएएल कंपनीचे ऑर्डर बॅकलॉग 1100 कोटी डॉलर्स नोंदवले गेले होते.

एचएएल स्टॉक कव्हर करणाऱ्या 16 तज्ञांपैकी 14 जणांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर एकाने हा स्टॉक होल्ड करण्याचा आणि एकाने विकून प्रॉफिट बुक करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, एचएएल स्टॉक पुढील काळात किंचित खाली येऊ शकतो. त्यामुळे तज्ञांनी या शेअरची टार्गेट प्राइस 5,469 रुपयेवरून कमी करून 4,380 रुपये केली आहे. भारतीय डिफेन्स सेक्टरमध्ये व्यवसाय करणाऱ्या भारत डायनॅमिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, पारस डिफेन्स स्टॉकमध्ये देखील विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. आगामी बजेटपूर्वी या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत आहे.

अँटिक ब्रोकिंग फर्मने एचएएल स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते हा स्टॉक दीर्घकाळात 6,145 रुपये किमतीवर जाऊ शकतो. अँटिक फर्मने भारत डायनॅमिक्स स्टॉकवर 1,643 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स स्टॉकवर 339 रुपये आणि भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर 5,216 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HAL Share Price NSE Live 20 July 2024.

हॅशटॅग्स

#HAL Share Price(71)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x