15 December 2024 2:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Home Loan Alert | पैसे जवळ असून सुद्धा अनेक लोकं होम लोन का घेतात? याचा फायदा होतो की तोटा?

Home Loan Alert

Home Loan Alert | आपल्या स्वप्नातलं घर पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती स्वप्न पाहत असतो. त्याचबरोबर स्वप्न सातत्यामध्ये कशी उतरतील यावर विचार करत असतो. दरम्यान जगभरातील बहुतांश व्यक्ती आपली स्वप्नपूर्ती खरी करण्यासाठी त्या दिशेने वाटचाल करतात. परंतु ज्या व्यक्ती एकदम पैसे भरू शकत नाहीत ते होम लोनचा पर्याय निवडतात. परंतु अनेक लोकांकडे पैसा असून सुद्धा ते होम लोन घेतात. या मागे नेमकं कोणतं कारण असेल याचा विचार तुम्ही केलाय का? चला तर मग होम लोन विषयी जाणून घेऊया सविस्तर माहिती.

हातामध्ये पैसा असूनसुद्धा गृहकर्ज घेण्याचे अनेक फायदे आहेत. होम लोनचा सर्वात पहिला फायदा म्हणजे बँक किंवा काही वित्तीय संस्था कर्ज देण्यापूर्वी तुम्ही खरेदी करत असलेली जागा वादविवादात तर नाही ना?, मालमत्तेवर इतर कर्ज किंवा कोणते गैरप्रकार तर नाही ना?. या सर्व गोष्टींची पुरेपूर चाचपडताळणी करून आणि कागदपत्र तपासून तुम्हाला होम लोन दिले जाते. असं केल्यामुळे नकळतपणे सुद्धा तुमच्या अंगलट गोष्टी येत नाहीत.

गृहकर्जाचे पैसे भरताना त्याचा मोठा फायदा होतो. आयकर अधिनियमाच्या कलम 24B च्या अंतर्गत व्याजावर तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात दोन लाख रुपयांची सवलत दिली जाते. त्याचबरोबर कलम 80c अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. त्यामुळे होम लोन तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

होम लोन काढण्याचे विशेष कारण म्हणजे भविष्यात महागाई कमी झाली तर, व्याजदर देखील कमी होते. इथून वाचलेले पैसे तुम्ही तुमच्या पुढील जीवनासाठी किंवा सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी साठवून ठेवू शकता.

होम लोनचा आणखीन एक फायदा म्हणजे जर तुम्ही जुने घर विकत घेतलं असेल म्हणजेच लोन वर घेतलं असेल तर, घराच्या डागडूजीसाठी तुम्हाला जास्त पैसे लागू शकतात. अशावेळी होम लोनवर टॉप-अप केले तर याचा देखील व्याजदर कमी भरावा लागतो.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही जॉईंट अकाउंटमधून लोन घेतले असेल तर, पती आणि पत्नी दोघांना देखील या सवलतीचा लाभ घेता येतो. जॉईंट अकाउंट असलेले खातेदार तब्बल सात लाख रुपयांपर्यंत बचत करू शकतात.

News Title : Home Loan Alert before applying for home loan 31 August 2024.

हॅशटॅग्स

#Home Loan Alert(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x