24 April 2024 12:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअरवर मिळतील फ्री बोनस शेअर्स, 1 वर्षात 462 टक्के परतावा दिला Penny Stocks | 10 पेनी शेअर्स जे अवघ्या 1 रुपया ते 9 रुपयांमध्ये खरेदी करू शकता, संयमातून श्रीमंत होऊ शकता IREDA Share Price | IREDA शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल? तज्ज्ञांनी जाहीर केला सपोर्ट लेव्हल आणि रेझिस्टन्स लेव्हल Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट आली, शेअर मोठ्या रॅलीसाठी सज्ज झाला, किती फायदा होईल? Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
x

Investment Tips | या सरकारी योजनेत दररोज 7 रुपयांची छोटीशी गुंतवणूक करा आणि मासिक 5000 पेन्शन घ्या

investment tips, atal pension Yojana

Investment Tips | भारत सरकारने देशातील लघु क्षमता असलेल्या गुंतवणूकदारांसाठी पेन्शन योजना सुरू केली. त्या योजनेचे नाव आहे अटल पेन्शन योजना. जर आपण वयाच्या 18 व्या वर्षापासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरु केली तर वयाच्या 60 व्या वर्षी आपल्याला परतावा म्हणून दरमहा 5000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी तुम्हाला फक्त रोज 7 रुपये म्हणजे 210 रुपये प्रति महिना गुंतवणूक करावी लागेल.

भविष्यातील आर्थिक नियोजन :
भविष्यातील आर्थिक नियोजन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो. आणि त्याचे योग्य नियोजन करणेही आवश्यक आहे. वृध्द वयात रोज खर्च भागवण्यासाठी ठराविक रक्कम आपल्याकडे असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने गुंतवणुकाचे नियोजन केले पाहिजे. लोकांची हिच चिंता ओळखून भारत सरकारने 2015 सली अटल पेन्शन योजनेची सुरुवात केली आहे. या योजनेत 18 ते 40 या वया दरम्यानचा कोणीही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो.

एक सुरक्षित योजना :
सरकारी योजना असल्याने ही एक सुरक्षित योजना मानली जाते कारण त्याला सरकारने सुरक्षा हमी दिलेली असते. आणि या योजनेत कोणत्याही फसवणुकीची जोखीम नसते. अटल पेन्शन योजनेनुसार वयाच्या 60 वर्षानंतर योजनाधारकला पेन्शन चा लाभ घेता येतो. या योजनेंतर्गत दर महा किमान 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 आणि कमाल 5,000 रुपये पेन्शन म्हणून मिळू शकते. जर आपल्याला या योजनेत गुंतवणूक करून फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे बचत खातं असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांकाची देखील आवश्यकता आहे.

दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन :
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे योजनाधारकने 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली तर त्याला वयाच्या 60 व्या वर्षी दर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठी त्याला फक्त 210 रुपये दर महिना गुंतवायचे आहेत. म्हणजे रोज फक्त 7 रुपये जमा करुन तुम्ही 5000 रुपयांची मासिक पेन्शन मिळवू शकता. दर महिन्याला 1000 रुपये मासिक पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त 42 रुपये प्रति महिना जमा करावे लागतील. 2000 रुपयांच्या पेन्शनसाठी 84 रुपये, 3000 पेन्शनसाठी 126 रुपये आणि 4000 पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा या योजनेत गुंतवणूक करावे लागेल.

कर सवलत लाभ उपलब्ध :
या सरकारी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या योजनाधारकाना आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळेल आणि यातून करपात्र उत्पन्नवर कोणताही कर द्यावा लागत नाही. याशिवाय, योजनेत काही खास नियमानुसा विशिष्ट प्रकरणामध्ये 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त कर सवलत उपलब्ध आहे. एकूणच, तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली की 2 लाख रुपयांपर्यंतची कर बचत करू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News title | Investment Tips Atal pension Yojana benefit on 23 July 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x