13 December 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
x

Stock Investment | या शेअरने फक्त 2 दिवसात 50 टक्के परतावा दिला, पुढे सुद्धा वेगाने पैसा वाढवणार हा स्टॉक, स्टॉक नेम सेव्ह करा

IPO Investment

IPO Investment | नुकताच हर्षा इंजिनियर्सचा शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. सूचीबद्ध झाल्यावर ह्या स्टॉकने फक्त 2 दिवसांत आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये फक्त 2 दिवसात 50 टक्के पेक्षा अधिक वाढ झाली आहे. हर्षा इंजिनियर्सच्या IPO मध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांना कंपनीचे शेअर्स 330 रुपये प्रति शेर या किमतीवर मिळाले होते.

हर्षा इंजिनियर्सकंपनीच्या शेअर्सने NSE आणि BSE वर जबरदस्त एन्ट्री केली आहे. हर्ष इंजिनियर्सचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 35 टक्के प्रीमियमसह 444 रुपयांवर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवट तासात या कंपनीचे शेअर्स 485.90 रुपये किमतीवर बंद झाले होते. सध्या हा स्टॉक त्याच्या इश्यू किमतीपेक्षा 47 टक्के अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारच्या व्यवहारादरम्यान, या कंपनीच्या शेअर्सने BSE वर 60 टक्के वाढीसह 527.60 रुपये किंमत गाठली होती.

हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स पडझडीतून लांब :
सलग दोन दिवस शेअरमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाल्यानंतर आता शेअर बाजारात विक्रीचा दबाव वाढत आहे. शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. मात्र, हर्षा इंजिनियर्सचे शेअर्स बाजाराच्या पडझडीतून लांब आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच BSE.निर्देशांकावर कंपनीचे शेअर्स 5 टक्के पेक्षा अधिक वाढीसह 511.25 रुपयांवर ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हर्षा इंजिनियर्सच्या शेअर्सने आपला 518.30 रुपयांचा नवीन उच्चांक गाठला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची दिवसातील नीचांक पातळी किंमत 483.05 रुपये होती.

70 पट अधिक सबस्क्राइब झाला :
कंपनीचा IPO 70 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. Harsha Engineers International च्या IPO ला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO मध्ये इश्यू केलेल्या शेअर्सवर 74.70 पट अधिक मागणी आली होती. हर्षा इंजिनियर्सच्या पब्लिक इश्यूमध्ये कंपनीने 1.68 कोटी शेअर्स ऑफर फार सेल साठी खीले केले होते, ज्यावर एकूण 125.96 कोटी शेअर्ससाठी मागणी प्राप्त झाली होती. 755 कोटी रुपयांच्या या IPO मध्ये , 455 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स इश्यू करण्यात आले होते आणि 300 कोटी रुपयांपर्यंतचे शेअर्स विक्रीसाठी खुले करण्यात आले होते. हर्षा इंजिनीअर्स इंटरनॅशनल च्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 314 ते 330 रुपये निश्चित करण्यात आली होती. हर्षा इंजिनीअर्स इंटरनॅशनल ही प्रिसिजन बेअरिंगची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे, ज्याचा संघटित बाजारतील एकूण वाटा 50-60 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IPO Investment of Harsha Engineering international share price return on 28 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x