11 December 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

IRB Infra Share Price | शेअर प्राईस 58 रुपये, 800% परतावा देणारा शेअर फोकसमध्ये, स्टॉक मालामाल करणार - NSE: IRB

Highlights:

  • IRB Infra Share PriceNSE:IRB – आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी अंश
  • कंपनीने नवीन अपडेट दिली
  • 12 राज्यांमध्ये 80,000 कोटी रुपयांची मालमत्ता
  • कंपनीचा बाजारपेठेतील एकूण वाटा सुमारे 38% टक्के
  • शेअरने 800% परतावा दिला
IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा शेअर लेटेस्ट अपडेटमुळे पुन्हा फोकसमध्ये (NSE:IRB) आला आहे. गुरुवार दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 2.56 टक्के घसरून 58.54 रुपयांवर ट्रेड करत होता. आयआरबी इन्फ्रा शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर 52 आठवड्यांची निच्चांकी पातळी 31.05 रुपये होती. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 1.52 टक्के वाढून 59.54 रुपयांवर पोहोचला होता. (आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीने नवीन अपडेट दिली
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने सप्टेंबर 2024 मध्ये टोल वसुलीत एकूण 19 टक्क्यांनी वाढ नोंदवल्याची माहिती एक्सचेंजला फायलिंगमध्ये दिली आहे. कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘सप्टेंबर 2024 मध्ये टोल महसूल 502 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो सप्टेंबर 2023 मध्ये 421 कोटी रुपये इतका होता. विशेष म्हणजे काही भागात प्रचंड पावसाचा सामना करूनही वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने ही वाढ झाल्याचं कंपनीने फायलिंगमध्ये नमूद केले आहे. तसेच वाढत्या प्रवास आणि आर्थिक हालचालींमुळे आगामी सणासुदीच्या काळात देखील वाढ कायम राहील, असा अंदाज आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने व्यक्त केला आहे.

12 राज्यांमध्ये 80,000 कोटी रुपयांची मालमत्ता
आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे देशातील सर्वात मोठी एकात्मिक खाजगी टोल रस्ते आणि महामार्ग पायाभूत सुविधा विकासक म्हणून पाहिले जाते. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीकडे देशातील एकूण 12 राज्यांमध्ये अंदाजे 80,000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीने 25 वर्षांहून अधिक काळ देशात सुमारे 18,500 लेन किलोमीटर रस्ते यशस्वीरित्या बांधले आहेत. तसेच टोल, ऑपरेट आणि देखभाल यामध्ये कंपनीला मोठा अनुभव आहे. देशात सुमारे 18,500 लेन पैकी 15,500 लेन किलोमीटर सध्या कार्यरत आहेत.

कंपनीचा बाजारपेठेतील एकूण वाटा सुमारे 38% टक्के
विशेष म्हणजे टीओटी क्षेत्रात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीचा बाजारपेठेतील एकूण वाटा सुमारे 38% टक्के आहे. कंपनीचे भारताच्या उत्तर-दक्षिण महामार्ग कनेक्टिव्हिटीमध्ये 12% योगदान आहे. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनीच्या सध्याच्या प्रकल्प पोर्टफोलिओमध्ये खाजगी आणि सार्वजनिक इनव्हिटसह 18 बीओटी, 4 टीओटी आणि 4 एचएएम प्रकल्पांसह 26 रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे.

शेअरने 800% परतावा दिला
आजच्या तारखेपर्यंत कंपनीचे एकूण मार्केट कॅप 35,425 कोटी रुपये आहे. जून 2024 पर्यंत IRB इन्फ्रा कंपनीत LIC ची 3.33% हिस्सेदारी आहे. 30 जून 2024 पर्यंत IRB इन्फ्रा कंपनीची ऑर्डरबुक 33,600 कोटी रुपये इतकी आहे. मागील 5 वर्षांत IRB इन्फ्रा शेअरने गुंतवणूकदारांना 800% परतावा दिला आहे. त्यामुळे पुढे या शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x