15 December 2024 12:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IREDA Share Price | IREDA शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए स्टॉक 6.35 टक्क्यांच्या वाढीसह 218.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 4 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.40 टक्के घसरणीसह 219.99 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक आतापर्यंत 108.79 टक्के मजबूत झाला आहे. ( इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड कंपनी अंश )

इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच आयआरईडीए कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7.20 टक्क्यांच्या वाढीसह 220.25 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर पोहचले होते. बुधवारी आयआरईडीए कंपनीचे 1.80 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. हा आकडा 54.88 लाख शेअर्स या दोन आठवड्यांच्या सरासरी शेअर्स ट्रेडिंगपेक्षा अधिक आहे.

बुधवारी एका दिवसात या कंपनीच्या शेअर्समध्ये 389.02 कोटी रुपये मूल्याची उलाढाल पाहायला मिळाली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 58,767.98 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने दैनिक चार्टवर मजबूत ब्रेकआउट दिला आहे. पुढील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 240-250 रुपये किमतीवर जाऊ शकतात.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकने 200 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 219 रुपये किमतीवर जबरदस्त प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 219 रुपये किमतीच्या वर टिकला तर शेअरची किंमत 235 रुपयेवर जाऊ शकते. आयआरईडीए स्टॉकची अल्पकालीन ट्रेडिंग रेंज 195 रुपये ते 240 रुपये दरम्यान राहू शकते.

आयआरईडीए स्टॉक सध्या आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 30 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या साध्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकचा 14 दिवसीय सापेक्ष सामर्थ्य निर्देशांक म्हणजेच RSI 71.45 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्या ओव्हरबॉट झोनमध्ये ट्रेड करत आहे. जून 2024 तिमाहीत कंपनीच्या कर्ज मंजुरित वार्षिक आधारावर 382.62 टक्के वाढ झाली आहे. जून 2023 तिमाहीत या कंपनीने 1,893 कोटी रुपये कर्ज मंजूर केले होते. तर जून 2024 तिमाहीत हे प्रमाण 9,136 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत आयआरईडीए कंपनीचे कर्ज वितरण 67.61 टक्क्यांच्या वाढीसह 5,320 कोटी रुपये किमतीवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत आयआरईडीए कंपनीने 3,174 कोटी रुपये कर्ज वितरीत केले होते. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत आयआरईडीए कंपनीचे थकित कर्ज 63,150 कोटी रुपये होते, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या 47,207 कोटी रुपयेच्या तुलनेत 33.77 टक्क्यांनी वाढले आहे.

आयआरईडीए कंपनीने बॉण्ड्सद्वारे 1,500 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याची योजना आखली आहे. 10 वर्षे आणि दोन महिन्यांच्या मुदतीसाठी कंपनीने 7.44 टक्के वार्षिक व्याजदराने भांडवल उभारणीची घोषणा केली आहे. आयआरईडीए ही कंपनी मुख्यतः केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील व्यवसाय करणारी मिनीरत्न दर्जा असणारी कंपनी आहे. ही कंपनी नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी आणि उपकरणे उत्पादन आणि प्रसारण यांसारख्या संबंधित क्रियाकलापांसाठी प्रकल्प सुरू झाल्यापासून ते पूर्ण झाल्यानंतर आर्थिक फंड आणि नॉन-फंड-आधारित सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 04 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x