14 December 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

IREDA Share Price | 1 महिन्यात 30% परतावा देणारा PSU शेअर पुन्हा शॉर्ट टर्म मध्ये मोठा परतावा देणार

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. आज या कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. मागील एका आठवड्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्के वाढली आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

मागील तीन महिन्यांत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 40 टक्के वाढवले आहे. जानेवारी ते जुलै 2024 या कालावधीत आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 150 टक्केपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 9 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.74 टक्के घसरणीसह 234.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील काळात आयआरईडीए स्टॉक 270 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 235 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने 248 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती.

चालू आर्थिक वर्षात आयआरईडीए कंपनी FPO च्या माध्यमातून भांडवल उभारणीचा प्रयत्न करणार आहे. नुकताच आयआरईडीए या सरकारी कंपनीला भारत सरकारने नवरत्न दर्जा बहाल केला होता. डिसेंबर 2023 या कंपनीचा IPO शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीने 2017 आणि 2019 मध्ये आपला IPO लाँच करण्याची तयारी केली होती, मात्र दोन्ही वेळा कंपनीची योजना अयशस्वी ठरली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 09 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x