20 April 2024 9:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

LIC Share Price | अदानी ग्रुप इफेक्ट! एलआयसी स्टॉकवर झाला नकारात्मक परिणाम आणि गुंतवणूक मूल्य चेक करा

LIC Share Price

LIC Share Price | गेल्या महिन्यात ‘हिंडेनबर्ग अहवाल’ प्रसिद्ध झाला आणि गौतम अदानी समूहासह जीवन विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअरला उतरती कळा लागली. ‘हिंडेनबर्ग अहवाल’ आल्यानंतर केवळ एलआयसी कंपनीच्या शेअर धारकांचे नुकसान झाले नाही तर, विमा क्षेत्रातील इतर कंपनीच्या शेअर्समध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर एलआयसी कंपनीचे शेअर्स 1 टक्के घसरणीसह 584.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 1 फेब्रुवारी 2023 रोजी एलआयसी शेअर 582.45 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Life Insurance Corporation Share Price | Life Insurance Corporation Stock Price | LIC Share Price | LIC Stock Price | BSE 543526 | NSE LICI)

हिंडेनबर्ग अहवाल आल्यानंतर एलआयसी कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 17 टक्के कमजोर झाले आहेत. त्याच वेळी एलआयसी कंपनीच्या बाजार भांडवलमधून एका महिन्यात 75 हजार कोटी रुपये उडाले आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी एलआयसी कंपनीचे बाजार भांडवल 4,44,141 कोटी रुपये होते, जे शुक्रवार दिनाक 24 फेब्रुवारी 2023 रोजी 3,69,790 कोटी रुपयेवर आले आहे.

अदानी समुहाच्या अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एलआयसी कंपनीने यावर्षी जानेवारी महिन्यात काही प्रमाणात नफा कमावला आहे. या काळात एलआयसी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत होते. 17 मे 2022 रोजी एलआयसी कंपनीचे शेअर्स 920 रुपये या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तथापि एलआयसी कंपनीने अद्याप अदानी पोर्टफोलिओ संबंधित नफा किंवा तोटा स्थितीबाबत माहिती जाहीर केली नाही आहे.

एलआयसीच्या गुंतवणुकीची टक्केवारी :
स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत एलआयसी कंपनी कळवले आहे की, त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक अदानी पोर्ट्स कंपनीमध्ये होती. एलआयसीने अदानी पोर्ट कंपनीचे 9.1 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. त्याच वेळी अदानी उद्योग समूहाच्या इतर सहा कंपन्यांमध्ये एलआयसीने 1.25 टक्के ते 6.5 टक्के इतके भाग भांडवल धारण केले आहे. मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअरची किंमत 17 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

एलआयसीचे नुकसान :
30 जानेवारी 2023 रोजी एलआयसी कंपनी माहिती दिली की, डिसेंबर 2022 अखेरीस अदानी समूहामध्ये एलआयसी कंपनीने इक्विटी आणि कर्ज रूपाने 35,917 कोटी रुपये गुंतवले आहेत. एलआयसी कंपनीने अहवालात माहिती दिली आहे की, अदानी उद्योग समूहाच्या सर्व कंपन्यांमधील इक्विटीचे एकूण खरेदी मूल्य 30,127 कोटी रुपये असून 27 जानेवारी 2023 रोजी त्याचे बाजार मूल्य 56,142 कोटी रुपये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार 23 फेब्रुवारी 2023 एलआयसी कंपनीच्या पोर्टफोलिओ मधील अदानी समूहाच्या शेअर्सचे मूल्य 27000 कोटींवर आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price 543526 LICI stock market live today on 27 February 2023.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(97)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x