1 May 2025 6:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA
x

LIC Share Price | एलआयसी शेअर आज घसरला, पण दुसरी सरकारत्मक बातमी येताच पुढची मजबूत टार्गेट प्राईस जाहीर

LIC Share Price

LIC Share Price | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एलआयसी कंपनीला 25,464 कोटी रुपये मूल्याची आयकर रिफंड ऑर्डर प्राप्त झाली आहे. हे इन्कमटॅक्स रिफंड जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीत मिळण्याची शक्यता आहे.

एलआयसी स्टॉक सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 6 टक्क्यांच्या वाढीसह 1150 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मात्र त्यानंतर या शेअरमध्ये जोरदार विक्री झाली, आणि शेअरची किंमत घसरली. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 1,004.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ग्लोबल ब्रोकरेज फर्म जेपी मॉर्गनने आपल्या अहवालात माहिती दिली आहे की, एलआयसी स्टॉकमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. नुकताच या कंपनीच्या शेअर्सने 1000 रुपये किमतीच्या पार मजल मारली होती. तज्ञांच्या मते, पुढील काळात हा स्टॉक 1340 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.

मागील महिन्यात इन्कमटॅक्स विभागाच्या अपील न्यायाधिकरणाने एलआयसी कंपनीला 25,464.46 कोटी रुपये रिफंडची नोटीस जारी केली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तिमाही निकाल जाहीर करताना माहिती दिली की, “आम्ही या इन्कम टॅक्स रिफंड प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत आणि या तिमाहीत आयकर विभागाकडून हा परतावा मिळण्याची अपेक्षा आहे,”

एलआयसी कंपनी चालू तिमाहीत बालकांच्या संरक्षणासाठी आणखी नवीन योजना लाँच करणार आहे. एलआयसी कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत जीवन उत्सव, इंडेक्स प्लस आणि इतर काही योजना लाँच केल्या होत्या. त्यांमुळे कंपनीच्या नवीन व्यवसायाची मार्जिन पातळी 16.6 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. या इन्कम टॅक्स रिफंडमुळे मार्च 2024 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात वाढ होऊ शकते.

मागील आठवड्यात एलआयसी कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना सांगितले की, तिसऱ्या तिमाहीत एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 49 टक्के वाढून 9,444 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 6.334 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 13 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या