29 March 2024 4:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

Multibagger IPO | शहाण्यांनी बँक FD त पैसे गुंतवले, तर आर्थिक शहाण्यांनी या IPO मध्ये, 1 वर्षात 300% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स

Multibagger IPO

Multibagger IPO | शेअर बाजारात जेव्हा एखद्या नवीन कंपनीचा IPO येतो, ही संधी गुंतवणूकदारांनाही मजबूत कमाईची संधी देते. IPO च्या माध्यमातून गुंतवणूकदार लिस्टिंग च्या दिवशी जबरदस्त पैसे कमवू शकतात. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड या स्मॉल-कॅप कंपनीच्या आयपीओने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत वाढवले, आणि त्यांना मंजबुत परतावा कमावून दिला. आता या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीत बोनस शेअर्स वाटपाचा अंतिम निर्णय घेतला जाईल. इतकी फायद्याची बातमी असून सुद्धा शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या कमजोरीसह 322.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Evans Electric Share Price | Evans Electric Stock Price | BSE 542668)

कंपनीबद्दल थोडक्यात :
30 एप्रिल 2019 रोजी इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत 52 रुपये प्रति शेअर निर्धारित केली होती. कंपनीचे शेअर्स 13 मे 2019 रोजी BSE निर्देशांकावर सूचीबद्ध झाले होते. आयपीओ सूचीबद्ध झाल्यावर आतपर्यंत या कंपनीच्या शेअर्समध्ये 322 रुपयांची वाढ पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी अवघ्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 385.19 टक्क्यांनी वाढवले आहे.

गुंतवणूकदार झाले मालामाल :
10 डिसेंबर 2021 रोजी इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनीचे शेअर्स 75.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता शेअरची किंमत 322.65 रुपयेवर पोहचली आहे. या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षभरात आपल्या शेअर धारकांना 328.49 टक्के नफा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाचे चार्ट पॅटर्न पाहिले तर आपल्याला समजेल की, जानेवारी 2022 च्या सुरुवातीला या कंपनीचे शेअर 93 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वर्षी आतापर्यंत इव्हान्स इलेक्ट्रिक कंपनी कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 246.94 टक्के मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. या कंपनीच्या शेअरने अवघ्या 6 महिन्यांत लोकांचे पैसे 293.48 टक्के वाढवले आहे. मागील एका महिन्याचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीच्या शेअरने लोकांना 293.48 टक्के बंपर परतावा मिळवून दिला आहे.

कंपनीचा उद्योग थोडक्यात :
इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड कंपनीची स्थापना 1951 मध्ये झाली होती. इव्हान्स इलेक्ट्रिक लिमिटेड ही स्मॉल कॅप कंपनी व्यावसायिक सेवा उद्योगात काम करते. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 44.27 कोटी रुपये आहे. ही कंपनी भारतात इलेक्ट्रो-मेकॅनिकल सर्व्हिसिंग आणि दुरुस्तीमध्ये सर्वात नावाजलेली कंपनी मानली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger IPO of Evans Electric Limited share has given huge Return and now company has decided to distribute free Bonus shares on 12 December 2022

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x