15 December 2024 2:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Stocks | या शेअरमध्ये दोन महिन्यांत 100 टक्केची वाढ, पुढे पैसा वेगाने वाढवेल हा शेअर, तुमच्याकडे आहे?

Multibagger Stocks

Multibagger Stocks | आज आपण या लेखात अश्या एक केमिकल कंपनीच्या शेअर बद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने शेअर बाजारातील तज्ञांनाही आपल्या तेजीने हैराण केले आहे. 14 जुलै रोजी 202.95 रुपये किमतीवर ट्रेड करणारा हा स्टॉक फक्त दोन महिन्यांत इतका सुसाट निघाला की त्याची किंमत आता दुप्पट झाली आहे. या दोन महिन्याच्या कालावधीत ज्यांनी ह्या स्टॉक मध्ये पैसे लावले त्या भागधारकांनी 100 टाकले पेक्षा अधिक परतावा मिळवला आहे.

आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेत आहोत त्या कंपनीचे नाव “फिनोटेक्स केमिकल्स” असे आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग व्यवहारामध्ये या केलिकल स्टॉकने बीएसई निर्देशांकावर 409.45 रुपयांची उच्चांक पातळी किंमत गाठली. ह्या केमिकल कंपनीच्या स्टॉकची किंमत 14 जुलै 2022 रोजी 202.95 रुपये होती, जी फक्त दोन महिन्यांत दुप्पट झालेली पाहायला मिळत आहे.

कंपनीने मागील आठवड्यात सेबी नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, ” सध्या कंपनीच्या संचालक मंडळाने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतलेला नाही, ज्यामुळे स्टॉकच्या किमतींमध्ये इतकी मोठी लक्षणीय चढ-उतार होईल”. नियामक फाइलिंगमध्ये कंपनीने स्पष्ट कले आहे की अनुक्रमे एप्रिल आणि जुलै महिन्यात वार्षिक आणि त्रैमासिक निकालाचे परिणाम सकारात्मक आले आहे. याच निकालातील सकारात्मक नफ्याचा परिणाम शेअर बाजारात स्टॉकच्या किमतीवर दिसून आला आहे.

कंपनीने स्पष्ट केले आहे की, कंपनीच्या शेअरच्या किमतीमध्ये जीअस्थिरता होती, ही पूर्णपणे बाजारातील अस्थिर परिस्थितीमुळे आणि साहजिकच बाजारावर दबावावर आधारित होती. कंपनीच्या संचालक मंडळाचे किंवा कंपनीचे स्वतः शेअरच्या किमतीवर कोणतेही नियंत्रण नाही असे कंपनीने स्पष्ट केले आहे. आणि शेअर्सच्या किंमतीतील चढउतारांशी कंपनीचा किंवा संचालकांचा कोणतही संबंध नाही.

कंपनीच्या व्यवसाय बद्दल सविस्तर माहिती :
फिनोटेक्स ग्रुप कंपनी कापड उद्योग, बांधकाम उद्योग, जल-शुध्दीकरण, खत निर्मिती, चामडे आणि पेंट कलर उद्योगांसाठी रसायने उत्पादन करते. या व्यवसायात फिनोटेक्स ग्रुप अग्रगण्य उत्पादकांपैकी एक मानली जाते. फिनोटेक्स कंपनी जगभरातील आपल्या ग्राहकांना कापड निर्मिती प्रक्रियेसाठी प्रीट्रीटमेंट सुविधा, डाईंग प्रक्रिया, छपाई प्रक्रिया आणि फिनिशिंग प्रक्रियेसाठी लागणाऱ्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी निर्माण करते आणि त्यांना सुविधा प्रदान करते. फिनोटेक्स ग्रुपची स्थापना 1979 मध्ये सुरेंद्र टिब्रेवाला यांनी केली होती. 2007 साली FCL ची पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापना झाली. आणि कंपनी मार्च 2011 मध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट झाली. आणि जानेवारी 2015 साली फिनोटेक्स कंपनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होऊन ट्रेड करू लागली.

कंपनीच्या शेअर्समधील वाढ :
एका वर्षाच्या कालावधीत या स्टॉकमध्ये 226 टक्के पेक्षा अधिक वाढ नोंदविण्यात आली आहे. हा केमिकल स्टॉक 2022 या वर्षात आतापर्यंत 196 टक्के पेक्षा अधिक वाढला आहे. केवळ सहा महिन्यांच्या काळात स्टॉकने 145 टक्के वर झेप घेतली आहे. मागील फिनोटेक्स केमिकलच्या स्टॉकमध्ये दोन महिन्यांत 100 टक्के ची वाढ झाली आहे.

दिग्गज गुंतवणूकदार आणि शेअर मार्केट तज्ञ आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओचे निरीक्षण केल्यास असे दिसून येते की त्यानी या कंपनीत जून 2022 पर्यंत 21,42,534 इक्विटी शेअर्स होल्ड केले आहेत. आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचा एकूण 1.93 टक्के वाटा आहे. आशिष कचोलियाकडे वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणुकीचा अनुभव आहे. त्यांनी हॉस्पिटॅलिटी, एज्युकेशन, इन्फ्रा, मॅन्युफॅक्चरिंग आणि केमिकल क्षेत्रातील गुंतवणुकीचा समावेश असलेला एक वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार केला आहे. आशिष काचोलिया हे स्टॉक मार्केटमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅप गटातील दर्जेदार स्टॉक निवडण्यासाठी ओळखले जातात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stock of Finotex chemical share price return on 14 September 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x