19 April 2024 10:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Multibagger Stocks | 106 टक्के परतावा देणाऱ्या या शेअरने मागील 5 दिवसात8 टक्के परतावा दिला, तेजीने वाढणाऱ्या स्टॉकचं नाव सेव्ह करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारात सध्या केमिकल स्टॉकमध्ये तेजी दिसून येत आहे. असाच एक केमिकल स्टॉक आहे ज्यात मागील काही दिवसात कमालीची वाढ झाली आहे. या स्टॉक चे नाव आहे “गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड”. हा केमिकल स्टॉक मागील काही दिवसांपासून तेजीत आला आहे. गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड ही एक अशी भारतीय रासायन कंपनी आहे जीला फ्लोरिन रसायन निर्मितीत तीस वर्षांहून जास्त व्यापार अनुभव आहे.

शेअर्सची वाटचाल :
गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड/GFL स्टॉकची मागील 52 आठवड्यांची कामगिरी जबरदस्त होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इंट्रा-डे चार्टवर हा स्टॉक 1 टक्क्यांनी वाढला होता, आणि त्यावेळी हा स्टॉक 4,025 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकी किमतीवर ट्रेड करत होता. मागील काही ट्रेडिंग सेशनपासून गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनी च्या शेअर मध्ये खरेदी वाढली आहे. ह्या स्टॉक ने आपल्या भागधारकांना दीर्घकाळात चांगला परतावा कमावून दिला आहे.

एका वर्षातील परतावा :
गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेडच्या स्टॉकमध्ये मागील पाच ट्रेडिंग सेशनपासून 8 टक्केपेक्षा अधिक वाढ पाहायला मिळाली आहे. या विशेष रसायन स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या भागधारकांना 106 टक्केचा भरघोस परतावा कमावून दिला आहे. चालू वर्ष 2022 मध्ये ह्या केमिकल स्टॉकमध्ये 59 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या गुजरात फ्लोरोकेमिकल्स लिमिटेड कंपनीचा मार्केट कॅप 44 हजार कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
मागील तीस वर्षापासून गुजरात फ्लोरोकेमिकल्‍स लिमिटेड ही रासायनिक क्षेत्रात उद्योग करणारी कंपनी फ्लोरिन रसायनांची निर्मिती करत आहे. कंपनी मुख्यतः विविध रसायन निर्मित उद्योगात गुंतलेली आहे. ही कंपनी मुख्यतः फ्लोरोपॉलिमर, फ्लोरोस्पेशालिटी, रेफ्रिजरंट्स आणि रसायनांची निर्मिती, विक्री आणि विपणन करते. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, गुजरात फ्लोरोकेमिकल्स कंपनीला पुढील 5-10 वर्षांत फ्लोरोपॉलिमर आणि बॅटरी केमिकल्समधील आपला उद्योग अधिक पटींनी वाढवण्याची संधी आहे. पुढील तीन वर्षांत कंपनीच्या महसूलत दुप्पट वाढ होण्याचा अंदाज ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने व्यक्त केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Gujrat FeroChemical Limited share price return on equity investment on 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x