15 December 2024 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Stocks | या जॅकपॉट शेअर्सने दिला आहे 500 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा, तुमच्या पोर्टफोलिओत आहेत हे स्टॉक्स?

Multibagger stocks

Multibgger Stocks | बीएसई म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्चेंज मध्ये या वर्ष 5.83 टक्के ची घसरण झाली आहे. पण या अस्थिरतेच्या आणि उलाढालीनंतर अनेक स्टॉकनी कठीण काळातही गुंतवणूकदारांना बंपर परतावा मिळवून दिला आहे. जागतिक स्तरावर सुरू असलेल्या घडामोडी, चीनच्या खुरापती, वाढती महागाई, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतीय शेअर बाजारातही अनिश्चिततेचे आणि गोंधळाचे वातावरण आहे. या दरम्यान राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजेच निफ्टी मध्ये 5.74 टक्के पडझड झाली आहे. त्याच वेळी, बीएसईमध्ये या वर्षी आतापर्यंत 5.83% ची घसरण झाली आहे. पण या चढ-उतारानंतरही अनेक स्टॉकनी या कठीण काळातही गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. अशा पाच स्टॉक्सची माहिती घेऊ.

सोनल अॅडेसिव्ह :
हा स्मॉल कॅप कंपनीचा शेअर 9.80 रुपयांवर ट्रेड करत होता. आता तो 50.70 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. 2022 मध्ये, या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 415% बंपर परतावा मिळवून दिला आहे. आणि गुंतवणुकदार करोडपती झाले आहे. या पेनी स्टॉकची 52 आठवड्याचा उच्चांक 50.70 रुपये होता. तर 52 आठवड्यांचा नीचांक 5.73 रुपये होता.

VCU डेटा मॅनेजमेंट :
या स्टॉकमध्ये 2022 या वर्षात 500% वाढ झाली आहे.आणि या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला आहे. या कालावधीत कंपनीचा शेअर 10.46 रुपयांवर ट्रेड करत होता. आता तो वाढून 61.90 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 95 कोटी रुपये आहे. जर आपण 52 आठवड्यांची कामगिरी पहिली तर या स्टॉकची सर्वोच्च किंमत 65.20 रुपये आहे. तर नीचांक 5.47 रुपये होता.

एबीसी गॅस :
या वर्षाच्या सुरुवातीला या कंपनीचा शेअर 13 रुपये वर ट्रेड करत होता. आता हा स्टॉक 39.75 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. या वर्षी आतापर्यंत या स्टॉकने गुंतवणूकदारांना 200% पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7 कोटी रुपये आहे.

रिस्पॉन्स इन्फ्रोमॅटिक्स :
या लघु भांडवल कंपनीच्या शेअर्समध्ये यावर्षी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचा शेअर 12.96 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 50.05 रुपयांवर गेला आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 37 कोटी रुपये आहे.

ध्रुव कॅपिटल :
हा एक पेनी स्टॉक असून याने आपल्या गुंतवणूकदारांना या वर्षी श्रीमंत केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक 4.54 रुपयांना ट्रेड करत होता. आता हा शेअर 24.10 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. या पेनी स्टॉकने 2022 मध्ये आतापर्यंत 430% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल 7 कोटी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger stocks has given bumper returns to investors on 26 July 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x