25 April 2024 2:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा Reliance Home Finance Share Price | 3 रुपयाचा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, अवघ्या 2 दिवसात 10% परतावा, खरेदीला गर्दी Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय
x

Multibagger Stocks | जबरदस्त, या शेअरने 1 वर्षात 800 टक्के परतावा दिला, आता स्टॉक स्प्लिटने मोठा फायदा, स्टॉकबद्दल जाणून घ्या

Multibagger Stocks

Multibagger Stocks | 2022 या चालू वर्षात शेअर बाजारात गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या स्टॉकच्या यादीत Deep Diamond कंपनीचा ही समावेश होतो. या वर्षी Deep Diamond कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. इतका जबरदस्त परतावा कमावून दिल्यानंतर कंपनीने आता शेअर्स चे विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. Deep Diamond च्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत स्टॉकचे विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. चला तर मग जाणून घेऊ या स्टॉक स्प्लिटबद्दल सविस्तर

स्टॉक स्प्लिटचे गुणोत्तर प्रमाण :
Deep Diamond कंपनीने SEBI नियामकला दिलेल्या माहितीनुसार, ” संचालक मंडळाच्या सदस्यांनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्स मध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालकांनी हा स्टॉक स्प्लिट चे गुणोत्तर प्रमाण 1:10 असे निश्चित केले आहे.” सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Deep Diamond कंपनीचा एक शेअर 10 शेअर्समध्ये विभागला जाईल, आणि 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरची दर्शनी मूल्य किंमत 1 रुपये होईल. Deep Diamond कंपनीची स्थापना 1993 मध्ये झाली होती.

शेअर बाजारातील कंपनीची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये deep Diamond कंपनीच्या शेअर्समध्ये 1.47 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली होती. या घसरणीनंतर कंपनीचा शेअर आता 134.50 रुपये किमतीवर आला आहे. मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरची किमत तब्बल 1191.58 टक्क्यांनी वर गेली आहे. 5 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांना आतापर्यंत 796.67 टक्क्यांचा मजबूत नफा झाला आहे. मागील वर्षभरात Deep Diamond कंपनीच्या शेअर्समध्ये 989.07 टक्क्यांची वाढ झाली असून गुंतवणूकदारांनी ह्यातून भरघोस कमाई केली आहे. चालू वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 804 टक्क्यांचा बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांची आकडेवारी पहिली तर Deep Diamond कंपनीच्या शेअर ने आपल्या गुंतवणूकदारांना 837 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे. Deep Diamond कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 142.20 रुपये आहे. दीप डायमंडचे बाजार भांडवल 41.74 कोटी रुपये असून ती एक स्मॉल कॅप कंपनी आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Deep Diamond share Price return on investment on 05 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x