25 April 2024 5:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार? Reliance Infra Share Price | रिलायन्स इन्फ्रा शेअर्स खरेदीला गर्दी, अवघ्या 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 21 लाख रुपये परतावा Amara Raja Share Price | मार्ग श्रीमंतीचा! हा शेअर खरेदी करा, अवघ्या 5 दिवसात दिला 33 टक्के परतावा
x

Nazara Technologies Share Price | झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील हा शेअर तेजीत येणार, एक बातमीने या सेक्टरमध्ये तेजी येणार

Nazara Technologies Share Price

Nazara Technologies Share Price | भारत सरकार ऑनलाइन गेमिंग कंपन्यावर सट्टेबाजीचे नियम लागू करण्याची तयारी करत आहे. ही बातमी येताच नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअर्समध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोमवार दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी या गेमिंग कंपनीच्या शेअरमध्ये अचानक वाढ पाहायला मिळाली होती. यापूर्वी 18 नोव्हेंबर 2022 रोजी हा स्टॉक 7 टक्क्यांच्या वर गेला होता. स्टॉक मार्केट मधील बिगबुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील ऑनलाईन गेमिंग कंपनीचा हा स्टॉक 1 ऑगस्ट 2022 रोजी 20 टक्के वाढीसह अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होता. NSE इंडेक्सवर या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1343.50 रुपये होती. तर या स्टॉकची 52 आठवड्याची नीचांक किंमत 470.05 रुपये होती. हा स्टॉक 21 जानेवारी 2022 रोजी उच्चांक किमतीवर तर 22 जून 2022 रोजी नीचांक किमतीवर ट्रेड करत होता. आज (०४ जानेवारी २०२३) शेअर 2.17% घसरून 598 रुपयांवर ट्रेड करत आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Nazara Technologies Share Price | Nazara Technologies Stock Price | BSE 543280 | NSE NAZARA)

सोमवार स्टॉक 5.21 टक्क्याच्या वाढीसह..
बऱ्याच महिन्यांनी नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये नजारा टेक्नॉलॉजी कंपनीचा स्टॉक 5.21 टक्क्याच्या वाढीसह 610.95 रुपयांवर ट्रेड करत होता. नाझारा कंपनीच्या शेअर्सनी मागील एका वर्षात आपल्या शेअर धारकांना नकारात्मक परतावा दिला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 50 टक्के घटली आहे. जर आपण नाझारा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या स्टॉकबद्दल तज्ञांचे मत विचारात घेतले तर, आपल्याला समजेल की, 9 पैकी 5 तज्ञ स्टॉक तात्काळ खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तर स्टॉक Buy On Dip चा सल्ला दिला आहे, तर इतर दोघांनी स्टॉक विकून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सट्टेबाजी नियमाच्या मसुद्यात ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना भारतात लागू असलेल्या कायदे आणि नियम पालन करणे बंधनकारक केले आहे. सट्टेबाजीशी संबंधित भारतात लागू असलेले सर्व नियम आणि कायद्याचे पालन या कंपन्यांना सक्तीने करावे लागेल. या कंपन्यांवर स्वयं-नियामक संस्थेकडे नोंदणी करणे, आणि त्यांचे भारतीय पत्ते आणि गेम प्लेयर्सची अनिवार्य पडताळणी करण्याची तरतूद नियमांत केली आहे. भारतातील सर्व कार्यरत ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन करावे लागेल. हा नियम सोशल मीडिया कंपन्यांसाठी ही 2021 साली लागू करण्यात आला होता.

नियम अंतर्गत तरतूद :
1) ज्यां गेमिंग कंपन्या स्वयं-नियामक संस्थेकडे नोंदणीकृत आहेत, अशा सर्व ऑनलाइन गेमिंग कंपन्यांसाठी नोंदणी चिन्ह प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
2) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत स्वयं-नियामक संस्थांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
3) ऑनलाईन गेम खेळणाऱ्या प्लेयर्सला डिपॉझिटची रक्कम काढणे किंवा परत करण्या संबंधित माहिती, जिंकलेल्या रकमेचे विवरण, गेम फी आणि गेममध्ये सामील असलेल्या लोकांचे इतर शुल्क या संबंधित सर्व माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technologies Share Price 543280 in focus check details 04 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x