14 December 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Nazara Technology Share Price | झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर 46% स्वस्त झालाय, स्टॉकमध्ये सध्या काय होतंय? खरेदी करावा का?

Nazara Technology Share Price

Nazara Technology Share Price | जगभरातील स्टार्टअप कंपन्यांना फंडिंग करणारी अमेरिकेतील ‘सिलिकॉन व्हॅली बँक’ आर्थिक संकटात सापडली आहे. याचा नकारात्मक परिणाम भारतीय कंपन्यांवर पडला आहे. भारतीय शेअर बाजारात सूचिबद्ध असलेली ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर अक्षरशः क्रॅश झाले आहेत. आज मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 रोजी ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचे शेअर्स 3.06 टक्के घसरणीसह 499.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 8.52 टक्के घसरण झाली आहे.

घसरणीचे कारण :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, त्यांच्या दोन उपकंपन्या ‘Kidopia Inc’ आणि ‘Mediaworx Inc’ यांच्या सिलिकॉन व्हॅली बँकेमध्ये 7.75 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 64 कोटी रुपये रोख ठेवी अडकले आहेत. अमेरिकेची सिलिकॉन व्हॅली बँक आर्थिक संकटात अडकली बँक बुडल्यात जमा आहे. सध्या ही बँक फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच FDIC अंतर्गत निगराणी खाली आहे. नोटाबंदीमुळे ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीच्या सहायक कंपन्यांच्या रोख ठेवीही अडकल्या आहेत. मात्र यामुळे कंपनीच्या व्यवसायावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असे कंपनीने सेबीला कळवले आहे.

कंपनीतील गुंतवणूक :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीने Kidopia Inc कंपनीमध्ये 51.5 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. Kidopia Inc ही कंपनी Paper Boat Apps Pvt Ltd या कंपनीची 100 टक्के मालकी असलेली उपकंपनी आहे. तर Mediaworx Inc ही कंपनी Dataworx Business Solutions Private Limited या कंपनीची 100 टक्के मालकी असलेली उपकंपनी आहे. यात ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीने 33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

स्टॉकची स्थिती :
आज नजारा टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची किंमत 499.35 रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 475.05 रुपये आहे. 11 मार्च 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 925 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 46 टक्के खाली आला आहे. अमेरिकेतील बँक बुडाल्याचा या स्टॉकवर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम पडला आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात :
‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. गेमिंग आणि स्पोर्ट्स मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या ‘नजारा टेक्नॉलॉजी’ कंपनीचा स्टॉक कंपनी मार्च 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला. त्यावेळी कंपनीने आपल्या IPO साठी किंमत बँड 1100-1101 रुपये निश्चित केली होती. त्याच वेळी बीएसई निर्देशांकावर या कंपनीचे शेअर्स 1971 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. म्हणजेच हा शेअर आतापर्यंतच्या लिस्टिंग किंमतीपासून 75 टक्क्यांनी कमजोर झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Nazara Technology Share Price return on investment check details on 14 March 2023.

हॅशटॅग्स

Nazara technology share price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x