14 December 2024 6:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, पुन्हा मल्टिबॅगर परतावा? यापूर्वी दिला 266% परतावा

NBCC Share Price

NBCC Share Price | एनबीसीसी कंपनीचे शेअर्स बुधवारी 3 टक्के वाढीसह 178.90 रुपये किमतीवर पोहचले होते. बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी एनबीसीसी कंपनीची उपकंपनी HSCC इंडिया लिमिटेडला हरियाणाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाने 528.21 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर दिली आहे. ( एनबीसीसी कंपनी अंश )

मागील एका आठवडयात या सरकारी कंपनीला मिळालेली ही तिसरी ऑर्डर आहे. त्यामुळे कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. या ऑर्डर अंतर्गत एनबीसीसी कंपनीला पंडित दीनदयाल उपाध्याय आरोग्य विज्ञान विद्यापीठ, कर्नालसाठी बायो मेडिकल आणि हॉस्पिटल फर्निचर खरेदी करण्याचे काम देण्यात आले आहेत.

आज शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी एनबीसीसी स्टॉक 0.51 टक्के वाढीसह 174.51 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. एनबीसीसी कंपनीला मिळालेल्या 19.97 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डरमध्ये कंपनीला हैदराबादमधील आनंद नगर कॉलनी येथे हैदराबाद चॅप्टरची नवीन इमारत बांधण्याचे काम देण्यात आले आहे. एनबीसीसी कंपनीला ही ऑर्डर इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने दिली आहे.

दुसऱ्या ऑर्डर अंतर्गत एनबीसीसी कंपनीला झाशी विकास प्राधिकरणाकडून स्वयं शाश्वत मोडवर झाशीमधील दोन जमीन पार्सल विकसित करण्यासाठी 710 कोटी रुपये मूल्याचे काम देण्यात आले आहे. तसेच श्रीनगर विकास प्राधिकरणाकडून कंपनीला 15,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत कंपनीला श्रीनगरमध्ये 406 एकर जमिनीवर सॅटेलाइट टाउनशिपचा विकास करण्याचे काम देण्यात आले आहे.

जून तिमाहीत एनबीसीसी कंपनीचा नफा 38.5 टक्के वाढून 107.2 कोटी रुपये नोंदवला गेला होता. याच तिमाहीत कंपनीचा महसूल 11.3 टक्के वाढून 2,144.2 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA 60.6 टक्के वाढून 91.7 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. जून तिमाहीत कंपनीचा EBITDA मार्जिन 3 टक्केवरून वाढून 4.3 टक्केवर पोहचला आहे. 2024 या वर्षात एनबीसीसी स्टॉक 115.71 टक्के वाढला आहे.

मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 266 टक्के परतावा कमावून दिला आहे. एका वर्षभरापूर्वी या कंपनीच्या शेअरची किंमत 47 रुपये होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 198.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 46.80 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 31,266 कोटी रुपये आहे. एलआयसी सारख्या दिग्गज सरकारी कंपनीने एनबीसीसी कंपनीमध्ये 10,73,25,394 शेअर्स म्हणजेच 5.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

News Title | NBCC Share Price NSE Live 16 August 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

NBCC Share Price(68)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x