11 December 2024 5:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC
x

सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही | मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात - शरद पवार

Sharad Pawar

मुंबई, ०७ सप्टेंबर | देशात गुजरात आणि महाराष्ट्राचं योगदान हे सहकार क्षेत्रात खूप मोठं आहे. आज सहकार हा विषय देशपातळीवर बघणारे नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघेही गुजरातचे आहेत. अमित शाह तर स्वतः हा अहमदाबाद सहकारी संस्थेचे संचालक होते. ज्या लोकांच्या आयुष्यातील काही कालखंड हे सहकारात गेलं, ते सहकाराला उद्ध्वस्त करू शकत नाहीत, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं.

सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही, मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात – NCP president Sharad Pawar opinion on central government co operative sector :

साधना सहकारी बँक लि. च्या मुख्य कार्यालयांच्या प्रशासकीय नुतन वास्तूचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पद्मश्री डॉ. सुदाम काटे, विद्याधर अनास्कर, अनिरुद्ध देशपांडे, आमदार चेतन तुपे, दिलीप आबा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे देखील अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

देशात 60 टक्के नागरी बँका गुजरात आणि महाराष्ट्रात:
नागरी बँका आणि सहकारी बँका यांच्यात महाराष्ट्राचं योगदान हे खूप मोठं आहे. देशातील एकंदरीत नागरी बँकांपैकी 60 टक्के नागरी बँका दोन राज्यात आहेत, ते म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात आणि या दोन राज्यातील बँकांचं कामकाज बघितलं तर खूप चांगलं आहे. सहकारावर श्रद्धा असलेलं मोठं वर्ग या दोन्ही राज्यात आहे. राज्य सहकारी बँकही आशिया खंडातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते, असंही यावेळी पवार यांनी सांगितलं.

सामान्य माणूस नव्हे तर मोठे व्यक्तीच कर्ज बुडवतात:
सर्वसामान्य नागरिक कधीही कर्ज बुडवत नाही. मोठी माणसेच नेहमी कर्ज बुडवतात. सर्वसामान्य नागरिक हे उशिरा का होईना कर्जाची परतफेड करत असतात. सामान्य माणसाला बँकेचा जेवढा जास्त फायदा होईल, तेवढं जास्त बँक वाढत राहील. सर्वसामान्य नागरिकांचा नेहमीच विचार व्हायला हवं, असं मत यावेळी पद्मश्री डॉ. सुदाम काटे यांनी व्यक्त केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: NCP president Sharad Pawar opinion on central government co operative sector.

हॅशटॅग्स

#Banks(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x