
Olatech Share Price | ओलाटेक सोल्युशन्स या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक खुश खबर आहे. नुकताच कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 17:20 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे.
ओलाटेक सोल्युशन्स कंपनी आपल्या शेअर धारकांना प्रत्येक 20 शेअर्सवर 17 बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. आज शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी ओलाटेक सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 3.32 टक्के वाढीसह 184.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, ओलाटेक सोल्युशन्स कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना प्रत्येक 20 शेअर्सवर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले 17 बोनस इक्विटी शेअर्स वाटप करणार आहे. शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे. कंपनीने आपले शेअर धारकांना बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 20 नोव्हेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड देत म्हणून निश्चित केला आहे.
ओलाटेक सोल्युशन्स कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये 7.47 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 2.62 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने 5.82 कोटी रुपये खर्च नोंदवला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 2.15 कोटी रुपये खर्च नोंदवला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये ओलाटेक सोल्युशन्स कंपनीने 1.19 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने 0.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ओलेटेक सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 180 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 ऑक्टोबर रोजी ओलाटेक सोल्युशन्स स्टॉक 234.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचला होता. तर 24 मार्च रोजी या कंपनीचे शेअर्स 75.00 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअरधारकांना 256 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात ओलाटेक सोल्युशन्स कंपनीच्या शेअरची किंमत 193.49 टक्के वाढली आहे. ओलाटेक सोल्युशन्स ही स्मॉल कॅप कंपनी मुख्यतः डिजिटल मार्केटिंग, टेलिकॉम, डेटा सेंटर, एंटरप्राइझ आणि आयटी सॉफ्टवेअर सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.