25 April 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी? IRFC Share Price | IRFC शेअर मोठी उसळी घेणार, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, यापूर्वी 541 टक्के परतावा दिला Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर्स खरेदी करा, लवकरच मजबूत परतावा देणारा, किती टक्के कमाई होणार? Angel One Share Price | अशी संधी सोडू नका! एंजेल वन शेअर्स अल्पावधीत देईल 40% परतावा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राइस जाहीर Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! या दारू कंपनीचे शेअर्स खरेदीला गर्दी, रोज अप्पर सर्किट, यापूर्वी करोडमध्ये परतावा दिला
x

Paytm Share Price | एअरटेलचे सुनिल मित्तल पेटीएममध्ये गुंतवणूक करणार? पेटीएम शेअर प्रचंड चर्चेत, पुढे काय होणार?

Paytm Share Price

Paytm Share Price | चीन मधील ‘अँट ग्रुप’ भारतातील दिग्गज फिनटेक कंपनी ‘पेटीएम’ मधील आपले शेअर्स विकणार आहे, अशा बातम्यांना उधाण आले आहे. वास्तविक ‘अँट ग्रुप’ पेटीएममधील आपले काही शेअर्स विकण्याचा विचार करत असल्याची बातमी येत आहे. चिनी फिनटेक जायंट ‘वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेड’ कंपनीमधील आपले शेअर्स विकणार आहे, मात्र चर्चा अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याची माहिती मिळत आहे. महत्वाची गोष्ट अशी की, ‘अँट ग्रुप’ आणि ‘पेटीएम’ कडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Paytm Share Price | Paytm Stock Price | BSE 543396 | NSE PAYTM | One 97 Communications Share Price | One 97 Communications Stock Price)

अँट ग्रुप’ ची योजना :
‘अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेड’ कंपनीने नुकताच पेटीएम कंपनीमधील आपले भाग भांडवल विकले आहेत. वाढत्या भू राजकीय तणावामुळे चीनच्या या दिग्गज ई कॉमर्स कंपनीने भारतातील आपली गुंतवणूक कमी केली आहे. मात्र ‘अँट ग्रुप’ स्टॉक विक्रीची योजना राजकीय कारणांमुळे नाही तर काही तांत्रिक कारणांमुळे आखली आहे. ‘अँट ग्रुप’ कडे डिसेंबर 2022 पर्यंत पेटीएम कंपनीचे 24.86 टक्के भाग भांडवल होते, परंतु बायबॅकनंतर शेअर्सची संख्या खाली आली आहे. 13 फेब्रुवारी 2023 रोजी बायबॅक ऑफर सुरू झाल्यानंतर ‘अँट ग्रुप’ कडे आपले भाग भांडवल विकण्यासाठी आणखी 90 दिवस आहेत. पेटीएम कंपनीने डिसेंबर 2022 मध्ये 8.5 अब्ज रुपये मूल्याची बायबॅक ऑफर जाहीर केली होती.

सुनील मित्तल पेटीएममध्ये गुंतवणूक करणार? :
सध्या शेअर बाजारात अशी बातमी आहे की, भारतीय दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारती एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांना एअरटेल पेमेंट्स बँकेचे वित्तीय सेवा युनिट पेटीएम विलीन करायचे आहे. यासाठी त्यांनी पेटीएम कंपनीशी बोलणी सुरू केली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सुनील मित्तल विलीनीकरणाद्वारे पेटीएम कंपनीमध्ये भाग भांडवल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पेटीएम कंपनी सोबत स्टॉक डील करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासह सुनील मित्तल हे पुढील देखील पेटीएम कंपनीचे शेअर होल्डर बनले तर आश्चर्याचे कारण नाही. मात्र ही डील अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने त्याबाबत तज्ञ खात्रीशिर काही सांगू शकत नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Paytm Share Price 543396 stock market live today as on 27 February 2023.

हॅशटॅग्स

#Paytm Share Price(79)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x