13 December 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
x

Penny Stocks | 1 ते 20 रुपयांचे हे पेनी शेअर्स गुंतवणूकदारांना 800 पटीने परतावा देत आहेत, पुढेही नफ्याचे, स्टॉकची नावं सेव्ह करा

Penny Stocks

Penny Stocks | शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपण वेगवेगळ्या सेक्टरमधील स्टॉक चे निरीक्षण करत असतो, आणि त्या सेक्टर मध्ये तेजी असते,त्यात आपण पैसे लावतो. पण एक सेक्टर असा आहे ज्यात पडझड खूप कमी प्रमाणात होते. भारतीय केमिकल सेक्टरमध्ये पडझड इतर सेक्टरच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे केमिकल सेक्टर गुंतवणुकीसाठी नेहमी चांगले मानले जातात.

शेअर बाजारातील तज्ञ आणि गुंतवणूकदार, ब्रोकरेज हाऊस केमिकल सेक्टरबद्दल अतिशय सकारात्मक आहेत आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जात आहे. या क्षेत्रातील असे काही मजबूत स्टॉक आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीत 800 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 रुपये ते 20 रुपये या किमतीवर ट्रेड करणारे हे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस पैसा कमावून देतात. त्याच वेळी, यापैकी काहींचे मूलभूत तत्त्वे इतके मजबूत आहेत की त्यांना भविष्यातील ब्ल्यू चीप स्टॉक मानले जाते. पुढील काळात हे स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमवून देतील ह्यात शंका नाही.

Aarti Industries :
आरती इंडस्ट्रीज च्या स्टॉकबद्दल माहिती घेतली तर आपल्याला कळेल की या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 800 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी हा स्टॉक 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 28 सप्टेंबर 2022 मध्ये हा स्टॉक 800 रुपयांवर ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांनी 79900 टक्के म्हणजेच 800 पट अधिक नफा कमावला आहे. ब्रोकरेज हाऊस JM financial ह्या स्टॉकबाबत अतिशय तेजीत ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊसने हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला असून 960 रुपये लक्ष किंमत म्हणून निश्चित केली आहे.

Atul limited :
केमिकल कंपनी अतुल लिमिटेडच्या शेअरने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना करोडो रुपयांचा परतावा कमावून दिला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी आरती इंडस्ट्री चा शेअर 22 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 28 सप्टेंबर 2022 रोजी आरती इंडस्ट्री चा स्टॉक 8940 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी सुमारे 40500 टक्के नफा कमावला आहे. ब्रोकरेज हाऊस JM Financial या स्टॉक बाबत अतिशय सकारात्मक असून खरेदीचा सल्ला दिला आहे. या स्टॉक ची पुढील काळातील लक्ष किंमत 10145 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Sudarshan Chemical Industry :
सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना शानदार परतावा कमावून देत आहे. 17 मे 2006 रोजी हा स्टॉक 21 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 28 सप्टेंबर रोजी हा स्टॉक वाढून 420 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या अर्थाने, ह्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करून लोकांनी सुमारे 21 पट अधिक म्हणजेच 1910 टक्के परतावा कमावला आहे. ब्रोकरेज हाऊस जेएम फायनान्शियल ह्या स्टॉकबाबत अतिशय सकारात्मक आहे आणि त्यांनी आपल्या ग्राहकांना हे स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ह्या स्टॉक ची लक्ष किंमत 585 रुपये निश्चित करण्यात आली आहे.

केमिकल सेक्टर मधील स्टॉक वर तज्ञ सकारात्मक का आहेत?
ब्रोकरेज हाऊस JM Financial च्या मते, मागील 2 ते 3 वर्षांत भारतीय केमिकल कंपन्यांना योग्य मूल्य, स्थिर कच्च्या तेलाच्या किमती आणि चीन +1 धोरणातून मिळालेल्या नफ्याच्या आधारावर पुनर्मूल्यांकन केले गेले आहे. यामध्ये पुढील येणाऱ्या काळात वाढीव कमाई होण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म ह्या स्टॉक बाबत दीर्घकालीन गुंतवणूक करण्यास सकारात्मक दिसत आहेत. तथापि, विस्कळीत पुनर्प्राप्ती, उच्च चलनवाढ, वाढती ऊर्जा खर्च, कच्च्या मालाच्या किमतीतील अस्थिरता आणि पुरवठा-साखळीतील अडचणी केमिकल क्षेत्रासाठी धोकादायक घटक आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stocks in Chemical sector are in Focus by Stock market expert for investment on 29 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x