14 December 2024 6:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Ponni Sugars Share Price | एका बातमीने हा शेअर तेजीत, 100% परतावा देणारा शेअर आज 5.21% वाढला, खरेदी करणार स्टॉक?

Ponni Sugars Share Price

Ponni Sugars Share Price | शेअर बाजारात पडझड आणि अस्थिरता असताना शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी पोन्नी शुगर्स कंपनीचे शेअर्स 5.21 टक्के वाढीसह 496 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या इंट्रा-डे ट्रेड सेशनमध्ये हा स्टॉक 11 टक्क्यांच्या वाढीसह 479.15 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. मागील तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत या साखर कंपनीच्या शेअर्सची किंमत 240.10 रुपयेवरून सध्याच्या किमतीवर गेली आहे. म्हणजेच मागील तीन महिन्यात या स्टॉकमध्ये 100 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. यापूर्वी 19 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सनी 455 रुपये ही आपली सर्वकालीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Ponni Sugars Share Price | Ponni Sugars Stock Price | BSE 532460 | NSE PONNIERODE)

एका वर्षात दिला 116 टक्के परतावा :
गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पोन्नी शुगर्स कंपनीचे शेअर्स S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधील 0.45 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत 7.5 टक्क्यांच्या वाढीसह 462.65 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. NSE आणि BSE इंडेक्सवर 640,000 शेअर्सची खरेदी विक्रीसह सरासरी ट्रेडिंग व्हॉल्यूम 1.5 पट अधिक वाढली आहे. या वर्षी YTD आधारे पोन्नी शुगर्स कंपनीच्या शेअर्समध्ये 116.08 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. त्याच वेळी मागील एका महिन्यात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 92.58 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचे स्पष्टीकरण :
S&P BSE सेन्सेक्स इंडेक्समधील 3.4 टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत मागील एका महिन्यात पोन्नी शुगर्स कंपनीचे शेअर्स 51 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. पोन्नी शुगर्स कंपनीने 21 डिसेंबर 2022 रोजी जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, कंपनी वेळोवेळी जो अहवाल जाहीर करत असते, त्याशिवाय कंपनीकडे शेअर्समधील वाढीबाबत विशेष माहिती उपलब्ध नाही. या कंपनीने म्हटले आहे की, भारत सरकारने इथेनॉलवरील वस्तू आणि सेवा कर दर कमी केल्यामुळे आणि सरकारने अतिरिक्त साखर निर्यातीला परवानगी दिल्याने साखर क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्स मध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ponni Sugars Share Price in focus over return check details on 30 December 2022.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x