PPF Calculator | पीपीएफ गुंतवणुकीतून सुद्धा तुम्ही 5 कोटी रुपये उभे करू शकता, नियमित गुंतवणुकीचं गणित समजून घ्या
PPF Calculator | आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर, आता बँका मुदत ठेवीवरील व्याजदरही वाढवत आहेत, तेव्हा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेणार आहे, आणि त्यानंतर पीपीएफचे नवीन व्याजदर जाहीर केले जातील. अशी शक्यता आहे की PPF वरील व्याजदर वाढवले जातील.
PPF कॅल्क्युलेटर:
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना ही सरकार द्वारे संचालित, गुंतवणूकदारांसाठी अतिशय सुरक्षित योजनांमध्ये मानली जाते. तसेच या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर तुम्ही भरघोस परतावा मिळवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये तुमच्या द्वारे गुंतवलेले पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. अशा परिस्थितीत बाजारातील अस्थिरतेचा पीपीएफ मध्ये गुंतवलेल्या पैशांवर कोणताच नकारात्मक परिणाम होत नाही.
आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, पीपीएफमध्ये वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर सवलत दिली जाते. तसेच, मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या व्याज परताव्यावर कोणताही कर भरावा लागत नाही. तुम्ही पीपीएफ खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत तुम्हाला मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक आधारावर गुंतवणूक रक्कम जमा करण्याची मुभा दिली आहे.
पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा :
सध्या पीपीएफवर 7.1 टक्के व्याज परतावा दिला जातो. पण आरबीआयच्या रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर जेव्हा सर्व बँका एफडीवरील व्याजदरात वाढ करत आहेत, तेव्हा सप्टेंबरच्या अखेरीस सरकार बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेईल, आणि पीपीएफचे व्याजदर वाढवले जातील. 2015-16 मध्ये PPF वर 8.7 टक्के व्याज परतावा मिळत होता. सध्या मिळणारा व्याज परतावा 2015-2016 च्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा परतावा थोडा कमी झाला आहे.
कमाल गुंतवणूक :
PPF खात्यात, तुम्ही कमाल 15 वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात. आणि जर तुम्हाला पैशाची गरज नसेल तर तुम्ही 15 वर्षांनंतर तुमचे PPF खाते दर पाच पाच वर्षांच्या कालावधीसाठी पुढे वाढवू शकतात, अशा प्रकारे तुम्ही त्यात कमाल 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. पुढील काही वर्षासाठी पीपीएफ योजना वाढवायची असल्यास यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल.
सध्या तुमचे वय ही 25 वर्ष असेल आणि निवृत्तीच्या 60 व्या वर्षापर्यंत पुढील 35 वर्षे पीपीएफ खात्यात तुम्ही प्रती वार्षिक 1.5 लाख रुपये गुंतवत राहिल्यास मुदत पूर्ती झाल्यावर तुम्हाला 5 कोटी रुपये परतावा मिळू शकतो. ज्यामध्ये 52,50,000 रुपये तुमची गुंतवणूक केलेली रक्कम असेल, त्यावर तुम्हाला 1,74,47,857 रुपये व्याज परतावा दिला जाईल. ह्या व्याज परतव्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल. आणि तुम्ही तुमच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत एकूण 45 वर्षे PPF योजनेमध्ये गुंतवणूक करत राहिल्यास तुमची एकूण गुंतवणूक 67,50,000 रुपये असेल, या गुंतवणुकीवर तुम्हाला 4,72,99,295 कोटी रुपये परतावा मिळेल. आणि जर सरकारने पीपीएफवरील व्याजदर वाढवले तर तुमचा परतावा नक्कीच 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | PPF Calculator investment benefits for long term return on 18 August 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट