
Rudra Global Share Price | रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. चालू आठवड्यात या कंपनीचे शेअर्स सर्व ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आता या कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली आहे.
रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटसाठी 18 ऑक्टोबर 2023 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स स्टॉक 4.18 टक्के वाढीसह 138.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीने आपले शेअर्स 1 : 2 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली आहे. स्टॉक स्प्लिटसाठी शेअर धारकांची पात्रता निश्चित करण्याच्या उद्देशाने कंपनीने बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 हा दिवस ‘रेकॉर्ड तारीख’ म्हणून घोषित केली आहे. स्टॉक स्प्लिट योजनेत रेकॉर्ड तारखेचा उद्देश शेअर धारकांची पात्रता निश्चित करणे हा असतो.
रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 132.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील पाच दिवसांत रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 18.07 टक्के मजबूत झाले आहेत. मागील एका महिन्यात रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 19.24 टक्के परतावा कमावून दिला आहे.
YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 42.86 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना 55.16 टक्के परतावा कमावून दिला आहे. रुद्रा ग्लोबल इन्फ्रा प्रॉडक्ट्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना सुरूवातीपासून आतापर्यंत कमाल 328.59 टक्के नफा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.