13 December 2024 7:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

SJVN Share Price | शॉर्ट टर्म मध्ये 63% परतावा देणारा PSU शेअर फोकस मध्ये, मजबूत कमाई होणार

SJVN Share Price

SJVN Share Price | एसजेव्हीएन स्टॉकबाबत मोठी अपडेट आली आहे. अवघ्या तीन महिन्यांत एसजेव्हीएन कंपनीच्या किरकोळ शेअरधारकांची संख्या 12 लाखांनी वाढली आहे. याशिवाय देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी देखील एसजेव्हीएन कंपनीतील आपला वाटा वाढवला आहे. जून 2024 तिमाहीच्या शेवटी म्युच्युअल फंडांनी एसजेव्हीएन कंपनीचे 1.56 टक्के भाग भांडवल धारण केले होते. ( एसजेव्हीएन कंपनी अंश )

मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2024 तिमाहीत म्युचुअल फंडांचा एसजेव्हीएन कंपनीतील वाटा 1.54 टक्के होता. परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा कंपनीतील वाटा स्थिर आहे. भारत सरकारने या कंपनीचे 81.85 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी एसजेव्हीएन स्टॉक 0.71 टक्के वाढीसह 151 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

2024 या वर्षात एसजेव्हीएन कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 63 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण भागभांडवल 58,900 कोटी रुपये आहे. भारत सरकार देशातील जलविद्युत प्रकल्पांच्या विस्ताराची योजना आखत आहे. आत्तापर्यंत सरकारने 15 GW क्षमतेचे 37 जलविद्युत प्रकल्प विकसित केले आहेत. भारत सरकार ऊर्जा विकास योजने अंतर्गत आणखी 50 गिगावॅट क्षमतेची भर घालणार आहे. पुढील 5 वर्षांत भारत सरकार आपल्या जल विद्युत क्षमतेत आणखी 11.9 GW ची वाढ करणार आहे.

एसजेव्हीएन या कंपनीचे पूर्ण नाव सतलज जल विद्युत निगम लिमिटेड असे आहे. ही सरकारी कंपनी जलविद्युत म्हणजेच पाण्यापासून वीज निर्मिती करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1988 साली नाथपा झाकरी पॉवर कॉर्पोरेशन म्हणून करण्यात आली होती. ही कंपनी भारत सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SJVN Share Price NSE Live 13 July 2024.

हॅशटॅग्स

SJVN Share price(60)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x