25 April 2024 11:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

Stocks To Buy | 5 दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याचा मोतीलाल ओसवाल फर्मचा सल्ला, टार्गेट प्राईस आणि स्टॉक डिटेल्स पहा

Stocks To Buy

Stocks To Buy | लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असताना, शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली. दरम्यान जागतिक पातळीवरील नकारात्मक भावनांमुळे भारतीय शेअर बाजार जबरदस्त दबावात ट्रेड करत होता. 31 जानेवारी 2023 रोजी भारतीय बाजार हिरव्या निशानीवर क्लोज झाला. कंपन्यां आपले तिसऱ्या तिमाहीचे निकालही जाहीर करत आहेत. निकाल तसेच कॉर्पोरेट अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून आकर्षक किमतीवर ट्रेड करत आहेत. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूक करण्यासाठी पाच कंपन्यांच्या शेअर्सची निवड केली आहे. पुढील काळात या कंपन्यांचे शेअर्स 22 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतात.

1) टीसीएस :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने टीसीएस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्यासाठी 3,950 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. 31 जानेवारी 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 3358 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी टीसीएस कंपनीचे शेअर्स 1.54 टक्के वाढीसह 3,461.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या स्टॉकमध्ये पैसे लावून गुंतवणूकदारांना प्रति शेअर 570 रुपये म्हणजेच 17 टक्के परतावा मिळू शकतो.

2) सन फार्मा :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने सन फार्मा कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्यासाठी 1,220 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सन फार्मा कंपनीचे शेअर्स 0.96 टक्के घसरणीसह 1,005.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 18 टक्के परतावा देऊ शकतात.

3) कोल इंडिया :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने कोल इंडिया कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्यासाठी 275 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सन फार्मा कंपनीचे शेअर्स 1.43 टक्के घसरणीसह 217.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 50 रुपये किंवा 22 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून देऊ शकतात.

4) गोदरेज कंज्यूमर :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने गोदरेज कंझ्युमर कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्यासाठी 1,080 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सन फार्मा कंपनीचे शेअर्स 1.11 टक्के वाढसह 940.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 159 रुपये प्रति शेअर परतावा कमावून देऊ शकतात.

5) जेएसपीएल लिमिटेड :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने जेएसपीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्यासाठी 700 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. गुरुवार दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सन फार्मा कंपनीचे शेअर्स 5.44 टक्के घसरणीसह 575.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 92 रुपये प्रति शेअर म्हणजेच 15 टक्के परतावा कमावून देऊ शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy call recommended by Motilal Oswal brokerage firm on 02 February 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x