29 March 2024 6:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 30 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर?
x

Suzlon Energy Share Price | 10 रुपयांचा सुझलॉन एनर्जी शेअर 100% परतावा देणार? टॉप ब्रोकरेजने दिली टार्गेट प्राईस, खरेदी करावा?

Suzlon Energy Share Price

Suzlon Energy Share Price | एक काळ असा होता, जेव्हा सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना कंगाल बनवले होते, मात्र 2023 मध्ये हा स्टॉक लोकांना मालामाल बनवू शकतो. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत मागील 5 दिवसांत 7.54 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंगसेशन मधे हा स्टॉक 10.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.48 टक्के घसरणीसह 10.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2023 मध्ये हा स्टॉक 20 रुपयेपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Suzlon Energy Share Price | Suzlon Energy Stock Price | BSE 532667)

सुझलॉन एनर्जी शेअरचा इतिहास :
एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचा शेअर 390.09 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. 11 जानेवारी 2008 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 390.09 रुपयेवर पोहचली होती. पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात व्यापार करणाऱ्या या कंपनीच्या शेअर्सची किंमत 17 जानेवारी 2020 रोजी 2.50 रुपयांपर्यंत घसरली होती 19 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टॉक 7.70 रुपये किमतीपर्यंत पोहचला होता. आणि सध्या ऊर्जा क्षेत्रातील मागणी वाढत असल्यामुळे हा स्टॉक पुन्हा तेजीत आला आहे. पुढील काळात सुझलॉन एनर्जी शेअरची किंमत 20 रुपये पर्यंत जाऊ शकते.

गुंतवणुकीवर परतावा :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या शेअर धारकांना 7 टक्के परतावा कमावून दिला आहे. या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत लोकांना 75 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या शेअरने लोकांना 25 टक्के नकारात्मक परतावा दिला होता. ज्या लोकांनी 21 ऑक्टोबर 2005 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये 123.75 रुपये किमतीवर 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य कमी होऊन 9000 पेक्षा कमी झाले आहे. या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 12.15 रुपये होती, तर नीचांक किंमत पातळी 5.42 रुपये होती.

लक्ष किंमत :
सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरबाबत आयआयएफएल सिक्युरिटीजचे तज्ञ खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. तज्ञांनी या स्टॉकवर 4 रुपयेचा स्टॉप लॉस लावून 20 रुपयेच्या लक्ष्य किंमतीसाठी शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक 2023 मध्ये मल्टीबॅगर पेनी स्टॉक बनू शकतो, असा विश्वास तज्ञ व्यक्त करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Energy Share Price 532667 in focus check details on 05 January 2023.

हॅशटॅग्स

#Suzlon Energy Share Price(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x