11 December 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Suzlon Share Price | आता नाही थांबणार! 100% परतावा देणार सुझलॉन शेअर, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारी या कंपनीचे शेअर 4 टक्क्यांच्या (NSE: SUZLON) घसरणीसह 72.56 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 84.29 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 14 टक्क्यांनी घसरला आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

मागील पाच वर्षांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2050 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 2.70 टक्के वाढीसह 75.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअर बाजारातील तज्ञांनी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सवर 150 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 65 रुपयेवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्समध्ये 90 टक्के वाढ झाली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 192 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 803 टक्क्यांनी वाढली आहे.

तीन वर्षांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 1170 टक्के आणि पाच वर्षांत 2050 टक्के वाढला आहे. सुझलॉन एनर्जी स्टॉक S&P BSE 200 इंडेक्सचा भाग आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 99,816.56 कोटी रुपये आहे. किरकोळ गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणत खरेदी केली आहे. जून तिमाहीत परकीय संस्थागत गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड सारख्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांची शेअर होल्डिंग वाढवली आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये आपली शेअर होल्डिंग 25.93 टक्क्यांवरून कमी करून जूनमध्ये 23.16 टक्क्यांवर केली आहे. दरम्यान MFs ने त्यांचा हिस्सा 1.86 टक्केवरून वाढवून 3.82 टक्के केला आहे. FII नी देखील त्यांची गुंतवणूक मार्च तिमाहीत 19.57 टक्केवरून वाढवून जून तिमाहीत 21.53 टक्क्यांवर नेली आहे. सुझलॉन एनर्जी जगभरात 17 देशांमध्ये स्थापित असलेल्या 20.8 GW पवन ऊर्जा क्षमतेसह एक अग्रगण्य अक्षय ऊर्जा समाधान प्रदाता कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे. ही कंपनी जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क आणि भारतात इन-हाउस रिसर्च अँड डेव्हलपमेंट केंद्रांसह एकात्मिक संस्था म्हणून व्यवसाय करते.

News Title | Suzlon Share Price NSE: SUZLON 03 September 2024.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(269)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x