24 April 2024 10:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO शेअर आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 113 टक्के परतावा, GMP चा धुमाकूळ Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला
x

Tata Group Share | टाटा स्टॉकमध्ये नो घाटा! टाटा ग्रुपचा हा शेअर करोडपती करतोय, आजही आहे फेव्हरेट शेअर, डिटेल्स पहा

Tata Group Stock

Tata Group Share | शेअर मार्केट हे एक असे आभासी विश्व आहे, जे तुम्हाला गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करण्याची संधी देते. शेअर बाजारात गुंतवणूक करून उत्तम परतावा कमावण्यासाठी संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. हा शेअर टाटा उद्योग समूहाचा भाग असून त्याचे नाव आहे, ‘टाटा एलक्सी’. ‘टाटा एलक्सी’ कंपनीच्या शेअरने कोविडनंतर आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 6,666.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Tata Elxsi Share Price | Tata Elxsi Stock Price | BSE 500408 | NSE TATAELXSI)

‘टाटा एलक्सी’ शेअर किमतीचा इतिहास :
‘टाटा एलक्सी’ ही कंपनी टाटा उद्योग समूहाचा एक भाग असून या कंपनीचे स्टॉक मागील एका वर्षापासून विशेषत: रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर बेस बिल्डिंग मोडमध्ये व्यवहार करत आहेत. तथापि मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकमध्ये 6.64 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. पोस्ट-कोविड रीबाउंडमध्ये अवघ्या तीन वर्षांत हा स्टॉक 600 रुपये वरून 6,670 रुपयेवर पोहचला आहे. या कालावधीत ‘टाटा एलक्सी’ कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 1011.67 टक्के परतावा कमावून दिला आहे.

1 मार्च 2013 रोजी ‘टाटा एलक्सी’ कंपनीचे शेअर्स 94 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या हा स्टॉक 6,666.00 रुपयांवर पोहोचला आहे. या दरम्यान या स्टॉकने लोकांना 6995.74 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 1996 मध्ये या कंपनीचे शेअर्स 10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कालावधीत गुंतवणूकदारांनी ‘टाटा एलक्सी’ स्टॉकमधून 66600 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 1996 मध्ये ‘टाटा एलक्सी’ स्टॉकमध्ये 10 रुपये किमतीवर एक लाख रुपये गुंतवले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 6 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Elxsi Share Price 500408 TATAELXSI stock market live on 18 February 2023.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x