19 April 2024 8:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Tata Group Stocks | टाटा के साथ नो घाटा! टाटा ग्रुपचे हे शेअर्स खूप स्वस्त झाले आहेत, अशी संधी कधीच मिळणार नाही, पाहा लिस्ट

Tata Group Stocks

Tata Group Stocks | टाटा उद्योग समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी 2021 या वर्षात जबरदस्त परतावा दिला होता, मात्र 2022 मध्ये हे शेअर्स अपेक्षे प्रमाणे कामगिरी करू शकले नाही. टाटा उद्योग समूहातील 24 सूचीबद्ध कंपन्यांपैकी 15 कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. टाटा पॉवर, नेल्को, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टाटा मेटालिक्स, टाटा स्टील लॉंग प्रॉडक्ट्स, टाटा कम्युनिकेशन्स या शेअर्सनी 2022 या वर्षात निराशाजनक कामगिरी केली आहे.

जागतिक अस्थिरता, वाढती महागाई, युद्ध, कोरोना महामारी, वाढते व्याजदर, यूएस आणि युरोप सारख्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये येणारी आर्थिक मंदी, या सर्व चिंतेमुळे जागतिक स्तरावर IT कंपनीच्या शेअर्स मध्ये जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. 2022 या वर्षात TCS कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. बहुतेक विश्लेषक टेक सेक्टरमधील कंपनीच्या शेअर्स बाबत उत्साही नाही, परंतु त्यांनी टीसीएसपेक्षा इन्फोसिसला अधिक दिली पसंती आहे. 2023 या वर्षात आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहेत, या पार्श्वभूमीवर ब्रोकरेज फर्म जेफरीजने वाढत्या क्षेत्राचे मूल्यांकन करून एक अहवाल प्रकाशित केला आहे, त्यात त्यांनी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

टाटा उद्योग समूहातील ऑटो कंपनी टाटा मोटर्सने 2021 या वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली होती. एका वर्षात गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा दिल्यानंतर या स्टॉकने 2022 मध्ये नकारात्मक परतावा दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्समध्ये झालेली नकारात्मक घसरण जग्वार अँड लँड रोव्हरच्या व्यावसायिक परिणामामुळे पाहायला मिळाली आहे. टाटा मोटर्स कंपनी JLR मधून 90 टक्केपेक्षा अधिक महसूल कमवते. यूएस, युरोप आणि चीन या सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये JLR कंपनीला घटत्या मागणीचा सामना करावा लागत आहे.

टाटा ग्रुप शेअर्सची 2022 मधील कामगिरी :
* टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड (TTML Share Price) : 59.8 टक्के
* स्टॅम्पिंग अँड असेंबल लिमिटेड (Automotive Stampings and Assemblies share price) : 50.38 टक्के
* टाटा स्टील (Tata Steel Share Price) : 8 टक्के
* टाटा पॉवर (Tata Power Share Price) : 10.88 टक्के
* नाल्को (Nalco Share Price) : 13.35 टक्के
* टीसीएस (TCS Share Price) : 13.64 टक्के
* टाटा मेटालिक्स (Tata Metaliks Share Price) : 15.08 टक्के
* टाटा स्टील लॉग (Tata Steel Long Share Price) : 17.23 टक्के
* टाटा कम्युनिकेशन्स (Tata Communications Share Price) : 17.39 टक्के
* रैलिस इंडिया (Rallis India Share Price) : 19.98 टक्के
* टाटा मोटर्स (Tata Motors Share Price) : 21 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Group stocks in discount price check details on 28 December 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x