13 December 2024 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Tata Motors Share Price | टाटा मोटर्सचे शेअर्स आकर्षक किमतीवर उपलब्ध, खरेदीची सुवर्ण संधी, शेअरची टार्गेट प्राईस किती पहा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | सध्याच्या पडझडीच्या काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून पैसे कमवू इच्छित असाल तर तुम्ही टाटा ग्रुपचा भाग असेलल्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीच्या शेअरवर लक्ष ठेवले पाहिजे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म नोमुराने ‘टाटा मोटर्स’ कंपनीचे शेअर्स पडत्या किमतीवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, सध्याच्या किमतीवरून टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 20 टक्क्यांनी वाढू शकतात. मागील तीन वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने लोकांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. दीर्घ काळात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तिप्पट वाढ झाली आहे. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी देखील टाटा मोटर्समध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. (Tata Motors Limited)

टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ञांचे मत :
नोमुरा फर्मने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच तज्ञांनी टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर 508 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. बुधवार दिनांक 15 मार्च 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.79 टक्के घसरणीसह 413.35 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. सध्याच्या किंमतीपासून हा स्टॉक 20 टक्क्यांनी वाढू शकतो, असे तज्ञ म्हणतात. मागील एका वर्षभरात स्टॉकची कामगिरी सपाट राहिली आहे. तर दुसरीकडे, मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमवून दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या मध्ये मागील तीन वर्षांत गुंतवणूकदारांना 369 टक्के वाढ झाली आहे. 13 मार्च 2020 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 89.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

नोमुरा फर्मच्या मते, JLR कंपनीचे ऑर्डर बुक सकारात्मक आहेत. त्यात हळूहळू वाढ देखील होत आहे. ब्रोकरेज फर्मच्या अहवालानुसार टाटा मोटर्स कंपनीच्या व्यवस्थापनाला विश्वास आहे की, आर्थिक वर्ष FY24 मधील पहिल्या तिमाहीत व्यावसायिक वाहने Q4 FY23 मधील खरेदी पेक्षा जास्त राहतील. आणि FY2024 च्या दुसऱ्या तिमाहीपासून त्यात स्थिरता येईल.

टाटा मोटर्स ही कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत तोट्यातून बाहेर आली, आणि कंपनी मजबूत नफा कमावला. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीला 1516 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. ऑक्टोबर-डिसेंबर 2022 या तिमाहीत कंपनीने 2,958 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 कंपनीने उत्पन्न 88489 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 72,229 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत JLR कंपनीच्या उत्पन्नात 28 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

रेखा झुनझुनवाला यांची गुंतवणूक :
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टाटा मोटर्स कंपनीचे 1.6 टक्के भाग भांडवल आहेत. म्हणजेच त्यांनी एकूण 52,256,000 इक्विटी शेअर्स धारण केले आहेत. डिसेंबर 2022 तिमाहीमधील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार रेखा झुनझुनवाला यांच्या शेअरचे मूल्य 2,195 कोटी रुपये आहे. रेखा झुनझुनवाला दिवंगत राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी आहेत. राकेश झुनझुनवाला यांचे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात निधन झाले होते. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये बऱ्याच काळापासून सामील आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price 500570 return on investment check details on 15 March 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x