15 December 2024 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअर्समधून 4 वर्षात 1100% परतावा, आता तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. मागील पाच वर्षांत टाटा मोटर्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 340 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून डील आहे. कोरोना महामारीनंतर या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

एप्रिल 2020 मध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता टाटा मल्टर्स स्टॉक 800 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील चार वर्षांत टाटा मोटर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 1100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवले आहेत. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्स स्टॉक 0.47 टक्के घसरणीसह 792 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर बाजाराबाबत सल्ला देणाऱ्या अनेक ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीचे होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टाटा मोटर्स स्टॉकची टारगेट प्राइस 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढवली आहे. जेपी मॉर्गन फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवरील रेटिंग ‘बाय फ्रॉम होल्ड’ अशी अपग्रेड केली आहे.

तज्ञांच्या मते, टाटा मोटर्स स्टॉक पुढील काळात 925 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. जेपी मॉर्गन फर्मच्या मते, जग्वार लँड रोव्हर कंपनीचे वाढलेले मार्जिन आणि मुक्त रोख प्रवाह जास्त असल्यामुळे टाटा मोटर्स स्टॉक तेजीत आला आहे. टाटा मोटर्स कंपनीने सातत्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत प्रवासी वाहन बाजारातील 14.4 टक्के वाटा काबीज केला आहे.

टाटा मोटर्स कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 32 टक्क्यांच्या वाढीसह 79,611 कोटी रुपये निव्वळ महसूल संकलित केला होता. तर चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 105,128 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. याशिवाय, टाटा मोटर्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात दरवर्षी 526 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 898 कोटी रुपये निव्वळ तोटा नोंदवला होता.

तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्स कंपनीने 3,832 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. टाटा मोटर्स कंपनीचा निव्वळ नफा तिमाही-दर-तिमाही आधारावर 16 टक्क्यांनी वाढून 3832 कोटी रुपयेवर आला आहे. टाटा मोटर लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,91,000 कोटी रुपये आहे.

मागील एका वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 105 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या प्रवर्तकानी कंपनीचे जवळपास 46.38 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 17.70 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी टाटा मोटर्स कंपनीचे जवळपास 18.40 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे 17.52 टक्के शेअर्स होल्ड केले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price NSE 06 January 2024.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x