Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत येणार? तज्ज्ञांनी जाहीर केली टार्गेट प्राईस, किती परतावा मिळेल?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीचे आपल्या 2020 च्या नीचांक किंमत पातळीवरून 800 टक्के वाढले आहेत. 24 मार्च 2020 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 63.60 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासुन हा स्टॉक 814 टक्के मजबूत झाला आहे.
मागील ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने 585.95 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 0.36 टक्के घसरणीसह 581.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के घसरणीसह 559.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील तीन वर्षात टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 457 टक्के परतावा कमावून दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीचे बाजार भांडवल 1.93 लाख कोटी रुपये आहे. 26 डिसेंबर 2022 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 375.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 73.4 अंकावर आहे. यावरून सूचित होते की, हा स्टॉक ओव्हरबाट झोनमध्ये ट्रेड करत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.2 आहे, जो उच्च अस्थिरतेचे निर्देशक आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे.
Tips2trades फर्मच्या तज्ज्ञांच्या मते टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स अधिक खरेदी झाले आहेत. स्टॉकमध्ये 589 रुपये पुढील रेझिस्टन्ससह दैनंदिन चार्टवर तेजी पाहायला मिळत आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या किमतीवर प्रॉफिट बूक करण्याचा सल्ला दिला आहे. टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या सात वर्षांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत.
शेअरखान फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या स्टॉकवर 633 रुपये टार्गेट किमत जाहीर करून खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांना टाटा मोटर्सच्या JLR , PV आणि CV व्यवसायात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. तज्ञांच्या मते सध्याच्या स्तरावरून निव्वळ ऑटोमोटिव्ह कर्जात घट होईल.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिलाधर यांच्या मते, टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीने मागील तीन वर्षांत आपली उत्पादन क्षमता तीन पट वाढवली आहे. टाटा मोटर्स कंपनीने फोर्ड कंपनीचा सानंद प्लांट नुकताच खरेदी केला आहे. त्यामुळे कंपनीची क्षमता वार्षिक 1 दशलक्ष युनिट्सने वाढली आहे.
प्रभुदास लिलाधर फर्मच्या तज्ज्ञांच्या मते सानंद प्लांट अधिग्रहणात भांडवली गुंतवणुकीद्वारे 5,000 कोटी रुपयेची बचत झाली आहे. ब्रोकरेज फर्मने टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरवर 605 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. जेफरीज फर्मने टाटा मोटर्स स्टॉकवर प्रति शेअर 790 रुपये लक्ष किंमत जाहीर केली असून सध्याच्या किमतीवर 40 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Tata Motors Share Price today on 23 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- Government Job | महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती, पगार 1,42,400 रुपये
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC