14 December 2024 4:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Tata Power Vs Adani Power Share | टाटा पॉवर आणि अदानी पॉवर शेअरसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER

Tata Power Vs Adani Power Share

Tata Power Vs Adani Power Share | मागील काही दिवसांपासून ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये आहे. पॉवर सेक्टरमधील अनेक शेअर्स मल्टिबॅगर परतावा देतं असल्याचे आकडेवारी सांगते. पॉवर सेक्टरमधील टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या दोन मोठ्या कंपन्या आहेत. अदानी पॉवर शेअरने गुंतवणूकदारांना १३९३ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. तर टाटा पॉवर शेअरने ४५६ टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

नोमुरा इंडिया ब्रोकरेज – टाटा पॉवर शेअर टार्गेट प्राईस
टाटा पॉवर लिमिटेड कंपनीच्या शेअरने 2024 मध्ये 39% परतावा दिला आहे. मागील एका वर्षात टाटा पॉवर शेअरने 82% परतावा दिला आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग जाहीर केली आहे. त्यासाठी 560 रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर करण्यात आली आहे. कंपनीची ऑर्डरबुक झाल्याने कंपनी EPC व्यवसायात चांगली कामगिरी करण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नोमुरा इंडिया ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘कंपनीकडे सध्या १५,७०० कोटी रुपयांचे ऑर्डरबुक आहे, तसेच टाटा पॉवर कंपनीला ओडिशा डिस्कॉम व्यवसायामुळे नफ्यात मोठी वाढ होण्याचा विश्वास आहे.

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्म
टॉप ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने टाटा पॉवर शेअरसाठी ५७७ रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह ५३० रुपयांची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.89 टक्के घसरून 461.50 रुपयांवर पोहोचला होता.

अदानी पावर शेअर टार्गेट प्राईस
अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 2024 मध्ये 21.58% परतावा दिला आहे. तसेच मागील एका वर्षात 82.52% परतावा दिला आहे. स्टॉकबॉक्स ब्रोकरेजचे तज्ज्ञ अमेय रणदिवे म्हणाले की, अदानी पॉवर शेअरला ६२० ते ६०० रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे. अमेय रणदिवे यांनी अदानी पॉवर शेअरसाठी ७०० ते ७२५ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.60 टक्के घसरून 641.50 रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Vs Adani Power Share 11 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Power Vs Adani Power Share(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x