23 April 2024 2:54 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्समध्ये तेजी कायम राहणार? अपडेटनंतर तज्ज्ञांचे मत काय? GTL Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीजची कृपा झाली, स्वस्त GTL शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटले?
x

TTML Share Price | टीटीएमएल शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून 78% खाली, स्टॉकबाबत काय निर्णय घ्यावा?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीचे शेअर आल्या गुंतवणूकदारांचे नुकसान करत आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी 2023 रोजी ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 3.83 टक्के घसरणीसह 66.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. टीटीएमएल कंपनीचे शेअर मागील अनेक ट्रेडिंग सेशनपासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल शेअर्स 64.70 रुपये या नव्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. याआधी बुधवारी आणि गुरुवारीही स्टॉकने नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

TTML शेअर्स इतिहास :
बीएसई वेबसाईटवर उपलब्ध आकडेवारीनुसार, टीटीएमएल कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षापासून सतत घसरत आहे. मागील काही काळात आकर्षक परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून 78 टक्के खाली ट्रेड करत आहेत. 11 जानेवारी 2022 रोजी टीटीएमएल कंपनीचे शेअर्स 291.05 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक एका वर्षात 60 टक्के खाली आला आणि शेअरची किंमत 163 रुपयांवर आली होती. या वर्षी YTD आधारे शेअरची किंमत 28.27 टक्के खाली आली आहे. मागील पाच वर्षांत टीटीएमएल स्टॉकने लोकांना 968.99 टक्के परतावा कमावून दिला आहे.

कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टीटीएमएल कंपनी ही Tata Teleservices ची उपकंपनी मानली आहे. ही कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर म्हणून ओळखली जाते. टीटीएमएल कंपनी व्हॉईस, डेटा सेवा प्रदान करते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठ्या कंपन्यांच्या समावेश आहे. ही एक लार्ज कॅप कंपनी असून कंपनीचे बाजार भांडवल 12,873.20 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 11 February 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x