29 March 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? L&T Share Price | भरवशाचा L&T शेअर दैनिक चार्टवर ट्रेंड लाइन ब्रेकआउट देत आहे, तज्ज्ञांनी काय सल्ला दिला? Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स स्टॉकबाबत तज्ञ उत्साही, नवीन टार्गेट प्राइस जाहीर, किती परतावा मिळणार? Bonus Share News | सुवर्ण संधी! ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, वेळीच एन्ट्री घेऊन फायदा घेणार? IFCI Share Price | शेअरची किंमत 39 रुपये! IFCI शेअर चार्ट पॅटर्नमध्ये सकारात्मक वाढीचे संकेत, यापूर्वी 350% परतावा दिला Infosys Share Price | इन्फोसिस शेअरला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, या पातळीवर टिकल्यास अल्पावधीत उच्चांक किंमत स्पर्श करणार
x

TTML Share Price | मंदीच्या गर्तेत अडकलेल्या टीटीएमएल शेअरने नीचांक किंमत स्पर्श केली, ट्रॅप झालेल्या गुंतवणूकदारांनी काय करावे?

TTML Share Price

TTML Share Price | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र लिमिटेड’ म्हणजेच ‘टीटीएमएल’ कंपनीच्या शेअर्सला उतरती कळा लागली आहे. टाटा समूहाचा टीटीएमएल स्टॉक दररोज नवीन विक्रमी नीचांक किंमत पातळी स्पर्श करत आहे. शुक्रवार दिनांक 24 फेब्रुवारी 2023 रोजी ‘टीटीएमएल’ कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 59.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टीटीएमएल स्टॉकने 52.80 रुपये ही आपली नवीन नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. या स्टॉकची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 290 रुपये आहे. म्हणजेच हा शेअर आपल्या सर्वोच्च किंमतीपासून 82 टक्के खाली पडला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, TTML Share Price | TTML Stock Price | BSE 532371 | NSE TTML)

टीटीएमएल शेअर किमतीचा इतिहास :
जर तुम्ही टीटीएमएल कंपनीचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये 7.74 टक्के घसरण झाली आहे. मागील एका महिन्यात हा स्टॉक 28.11 टक्के खाली आला आहे. 2023 या नवीन वर्षात टीटीएमएल स्टॉक 35 टक्के घसरला आहे. तर मागील एका वर्षात टीटीएमएल स्टॉक 49.30 टक्के कमजोर झाला आहे. टीटीएमएल कंपनीचे बाजार भांडवल 11,837.09 कोटी रुपये आहे.

एका वर्षापासून स्टॉक दबावाखाली :
टीटीएमएल कंपनीचा स्टॉक मागील एक वर्षापासून विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. दर वार्षिक आधारावर टीटीएमएल कंपनीचा शेअर 56.29 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत हा स्टॉक 43.45 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. त्याचप्रमाणे मागील तीन महिन्यांत शेअर39.80 टक्क्यांनी तर गेल्या एका महिन्यात स्टॉक 29.42 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. गेल्या तीन वर्षांचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या स्टॉकने लोकांना 1721.65 टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून दिला होता. तर टीटीएमएल स्टॉक मागील दोन वर्षांच्या कालावधीत 240.46 टक्क्यांनी वाढला होता.

टीटीएमएल कंपनीचा व्यवसाय थोडक्यात :
टीटीएमएल कंपनी मुख्यतः कनेक्टिव्हिटी आणि कम्युनिकेशन सोल्यूशन्स संबंधित सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस या ब्रँड अंतर्गत भारतातील व्यवसायांना आणि ग्राहक कंपन्यांना कनेक्टिव्हिटी, सहयोग, क्लाउड, सुरक्षा, IoT, विपणन उपाय, यासारख्या सेवा प्रदान करण्याचे काम करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TTML Share Price 532371 stock market live on 24 February 2023.

हॅशटॅग्स

#TTML Share Price(61)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x