14 December 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

National Cooperative Conference 2021 | देशाच्या कृषी बजेटवरून माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लगावला टोला

national cooperative conference 2021

नवी दिल्ली, २५ सप्टेंबर | भारताचे पहिले सहकार मंत्री यांनी आज पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात सहकार क्षेत्रातील विविध मुद्यांना स्पर्श करत केंद्रातल्या मागच्या सरकारला कृषी बजेटचा “आरसा” दाखवून त्यांचे वाभाडे काढले. 2009-10 मध्ये कृषी क्षेत्राचे बजेट फक्त 12 हजार कोटी रुपये होते, असे त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा सांगून माजी कृषीमंत्र्यांना त्यांच्या कथित “अतुलनीय कामगिरीची” जाणीव करून दिली.

National Cooperative Conference 2021, देशाच्या कृषी बजेटवरून माजी कृषिमंत्र्यांना केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लगावला टोला – Union minister Amit Shah addresses first national cooperative conference in Delhi :

राष्ट्रीय सहकार परिषदेत (National Cooperative Conference 2021) भाषण करताना अमित शहा यांनी सहकाराचा दायरा वाढवून तो विशिष्ट वर्गात पुरता मर्यादित न ठेवता समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे केंद्रातल्या मोदी सरकारचे प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, की कृषी क्षेत्राचे सन 2009 – 10 चे बजेट 12 हजार कोटी रुपये होते. मी पुन्हा एकदा सांगतो 12 हजार कोटी रुपये होते. दिसताना हा आकडा फार मोठा दिसतो, पण केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर 2020 – 21 मध्ये कृषीचे बजेट सरकारने 1 लाख 34 हजार 499 कोटी रुपये केले.

कारण मोदी सरकारचे कृषी क्षेत्राला खऱ्या अर्थाने प्राधान्य आहे. शेतकरी सन्मान निधी, सॉइल हेल्थ कार्ड, शेतकरी पिक विमा योजना, शेतकऱ्याला त्याच्या खात्यात थेट रक्कम जमा करणे या योजना हे मोदी सरकारचे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत एक लाख 57 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत याची आठवण अमित शहा यांनी करून दिली. एक प्रकारे हा केंद्रातल्या माजी कृषीमंत्र्यांना आणि सध्या आंदोलन करीत असलेल्या पंजाबमधील आणि हरयाणातील शेतकऱ्यांना हा टोलाच होता.

अमित शहा यांनी पुन:पुन्हा भर देऊन युपीए सरकारच्या काळातले कृषी बजेट 12 हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले. त्यात मोदी सरकारने वाढ केल्याचे अधोरेखित केले. त्याच वेळी अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात संदर्भात देखील विशिष्ट राज्यांना सुनावले. सहकार क्षेत्र विशिष्ट लोकांच्या मुठीत आहे. त्यात पारदर्शकता नाही. ती पारदर्शकता आणली नाही तर सहकार क्षेत्र कालबाह्य ठरेल. सहकार क्षेत्रात निवडणुकीपासून निवड प्रक्रियेपर्यंत आणि सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणली पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले.

सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी त्यात सध्या पारदर्शकता नसल्याचेच अधोरेखित केले. सहकारी संस्थांचे सदस्यत्व खुले करण्याचे आग्रही प्रतिपादनही त्यांनी केले. यातून सहकार क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तसेच हा मुद्दा उपस्थित करूनच अमित शहा यांनी सहकार क्षेत्रात घुसलेल्या अपप्रवृत्तींना टोला हाणला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Union minister Amit Shah addresses first national cooperative conference in Delhi.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x