14 December 2024 2:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Vodafone Idea Share Price | फायद्याची अपडेट! 16 रुपयाचा व्होडाफोन आयडिया शेअर पुन्हा मालामाल करणार

Vodafone Idea Share Price

Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया या कंपनीचे शेअर्स मागील काही काळापासून विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. दरम्यान कंपनीसाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. आर्थिक संकटाना झुंज देणारी व्होडाफोन आयडिया कंपनी आणि नोकिया यांच्यातील थकबाकीबाबत लवकरच तोडगा निघू शकतो. मीडिया रिपोर्टनुसार व्होडाफोन आयडिया कंपनीने फिनलँडच्या नोकिया कंपनीला 1500 कोटी रुपये थकीत ऑपरेशनल देय रकमेची पुर्तता करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ( व्होडाफोन आयडिया कंपनी अंश )

ही थकबाकी डिसेंबर 2025 पर्यंत काही रोख हप्त्यांमध्ये दिली जाऊ शकते. मात्र नोकिया कंपनीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे की नाही, त्याबाबत अद्याप अपडेट आलेली नाही. नुकताच व्होडाफोन आयडिया कंपनीने नोकियाला प्रेफरेंशियल आधारावर 102.7 कोटी शेअर्स जारी केले होते. आज मंगळवार दिनांक 30 जुलै 2024 रोजी व्होडाफोन आयडिया स्टॉक 1.06 टक्के वाढीसह 16.22 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

व्होडाफोन आयडिया कंपनीच्या 19 जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या नवीन शेअरहोल्डर डेटानुसार, नोकिया कंपनीची स्थानिक युनिट असलेल्या नोकिया सोल्यूशन्स अँड नेटवर्क्स इंडियाने व्होडाफोन आयडिया कंपनीमध्ये 1.47 टक्के भागभांडवल धारण केले आहे. प्रेफरेंशियल इश्यूआधी व्होडाफोन आयडिया कंपनीवर नोकिया कंपनीची 3000 कोटी रुपयेची थकबाकी होती. आता कंपनीने प्रेफरेंशियल शेअर्स इश्यू करून निम्मी थकबाकी परतफेड केली आहे.

व्होडाफोन आयडिया स्टॉक सोमवारी 0.50 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 16.06 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. इंट्रा-डे ट्रेडमध्ये हा स्टॉक 2.75 टक्क्यांच्या वाढीसह 16.42 रुपये किमतीवर पोहचला होता. व्होडाफोन आयडिया कंपनी आपली थकबाकी परतफेड करण्यासाठी निधीची व्यवस्था करत आहे. 4G आणि 5G नेटवर्कच्या रोल आउटकडून कंपनीला भरपूर अपेक्षा आहेत. याआधी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल कंपनीच्या व्यवसाय विस्तारामुळे व्होडाफोन आयडिया कंपनीला महसुल घट झाल्याची समस्या भेडसावत होती. आता ही कंपनी पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या व्होडाफोन आयडिया कंपनीने नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 4G नेटवर्क आणि 5G सेवा रोलआउटच्या विस्ताराबाबत बोलणी सुरू केली आहे. कंपनीला 23000 कोटी रुपयेची इक्विटी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. तसेच ही कंपनी SBI च्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमकडून 23000-25000 कोटी रुपये मुदत कर्ज मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. याशिवाय कंपनी नॉन-फंड सुविधांद्वारे 10000 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रयत्न करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Vodafone Idea Share Price NSE Live 30 July 2024.

हॅशटॅग्स

#Vodafone Idea Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x