
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी शेअर्समध्ये गुरुवारी 6 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. मात्र दिवसा अखेर हा स्टॉक 4.50 टक्क्यांच्या वाढीसह 67.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील दोन महिन्यांत झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना 33 टक्के परतावा मिळवून दिला आहे. झोमॅटो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 57,755 कोटी रुपये आहे. मार्च 2023 तिमाहीत झोमॅटो कंपनीचा तोटा 48 टक्क्यांनी कमी होऊन 187.6 कोटी रुपयांवर आला आहे.
शेअरची सध्याची किंमत
मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत झोमॅटो कंपनीला 359 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. डिसेंबर 2022 तिमाहीत झोमॅटो कंपनीला 345 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.52 टक्के घसरणीसह 66.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे.
मार्च 2023 च्या तिमाहीत झोमॅटो कंपनीने 70 टक्क्यांच्या वाढीसह 2056 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 1211.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत इ कॉमर्स व्यवसाय वगळून इतर व्यवसायातील ऑपरेटिंग नफा वाढला आहे.
अन्न वितरण व्यवसायातून 78 कोटी रुपये नफा
मार्च तिमाहीत कंपनीच्या अन्न वितरण व्यवसायातून 78 कोटी रुपये नफा मिळाला आहे. पुढील 4 तिमाहीत कंपनीने आपल्या क्विक कॉमर्स व्यवसायासह समायोजित EBITDA आणि PAT ला प्रोफीटेबल बनवण्याचे लक्ष निश्चित केले आहे.
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेजने काय म्हटले?
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मचे तज्ञ म्हणतात की, “आम्ही झोमॅटो कंपनीच्या स्टॉकमधील दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधींबाबत सकारात्मक आहोत. ONDC आल्यानंतरही स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.” या सर्व गोष्टींचा विचार करून तज्ञांनी झोमॅटो कंपनीच्या स्टॉकसाठी 80 रुपये लक्ष्य किंमत निश्चत केली आहे.
याशिवाय ब्रोकरेज फर्म जेफरीजने देखील झोमॅटो कंपनीच्या स्टॉकवर 100 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. मागील एका महिन्यात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची किंमत 16 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील दोन महिन्यांत शेअरची किंमत 33 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअरची किंमत 11 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.