12 December 2024 12:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | आज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 मे 2024 रोजी अमेरिकेतील सोन्याचे दर 4 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्याने भारतातील सोन्याच्या किंमतीत सुद्धा मोठी घसरण झाली आहे. आज या लेखात 18 कॅरेट ते 24 कॅरेट सोन्याचे भाव दिले आहेत.

दरम्यान, व्याजदर कपातीच्या मुदतीबाबत अधिक चांगल्या संकेतासाठी गुंतवणूकदारांनी आपले लक्ष १ मे २०२४ रोजी होणाऱ्या अमेरिकन फेडरल ओपन मार्केट कमिटीच्या (एफओएमसी) बैठकीच्या निकालाकडे वळवले आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवर झाला आहे.

आज 22 कॅरेट सोन्याचा भाव
भारतात आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 1000 रुपयांनी घसरून 65,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा भाव
दुसरीकडे, भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव 1090 रुपयांनी घसरून 71,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव
दरम्यान, भारतात आज 18 कॅरेट सोन्याचा भाव घसरून 53,630 रुपये झाला आहे.

आज चांदीच्या दरातही घसरण
1 मे 2024 रोजी भारतातील चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळाली. जर तुम्ही आज 1 किलो चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 500 रुपयांच्या घसरणीनंतर तुम्हाला 83,000 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीसाठी 8,300 रुपये मोजावे लागतील.

गेल्या 10 दिवसांत भारतात 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम घसरण
सोन्याच्या दरात आज 1090 रुपयांची मोठी घसरण झाली, 30 एप्रिलला स्थिर राहिली, 29 एप्रिल 2024 रोजी 330 रुपयांची घसरण झाली, 28 एप्रिल (रविवारी) स्थिर राहिली, 27 एप्रिलला 220 रुपयांची वाढ झाली, 26 एप्रिलला 440 रुपयांची वाढ झाली.

25 एप्रिलला 380 रुपयांची घसरण, 24 एप्रिलला 490 रुपयांची वाढ, 23 एप्रिलला 1530 रुपयांची प्रचंड घसरण, 22 एप्रिलला 550 रुपयांची घसरण, 21 एप्रिलला स्थिर आणि 20 एप्रिलला 100 रुपयांची किरकोळ घसरण.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check details 01 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x