19 July 2019 9:43 AM
अँप डाउनलोड

आकृती बिल्डरसंबंधित SRA प्रकल्पबाधितांनी घेतली माजी आ. सुरेश शेट्टी यांची भेट; गृहनिर्माण मंत्र्यांची देखील भेट घेणार

आकृती बिल्डरसंबंधित SRA प्रकल्पबाधितांनी घेतली माजी आ. सुरेश शेट्टी यांची भेट; गृहनिर्माण मंत्र्यांची देखील भेट घेणार

मुंबई : अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी येथील गणेशपाडा आणि जोगेश्वरी येथील हरीनगर भागातील SRA प्रकल्पबाधितांनी माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेतली. सदर प्रकल्प आकृती बिल्डरशी संबंधित असून अनेक पात्रं रहिवाश्यांना त्यांचे भाडे तसेच घरांचा ताबा मागील काही वर्षांपासून अजून मिळालेलं नाही. त्यात संपर्क साधणाऱ्या प्रकल्पबाधितांना आकृती बिल्डरकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.

दरम्यान आज आकृती बिल्डरसंबंधित सर्व पात्र SRA प्रकल्पबाधितांनी काँग्रेसचे अंधेरी पूर्वे येथील माजी आमदार तसेच माजी आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेऊन संपूर्ण कैफियत त्यांच्याकडे मांडली आहे. त्यानंतर सुरेश शेट्टी यांनी देखील संबंधित विषयाचे गांभीर्य समजून घेतला असून, या विषयाला अनुसरून गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेणार असल्याचं आश्वासन सुरेश शेट्टी यांनी स्थानिकांना दिलं आहे. त्यामुळे प्रकल्पबाधितांच्या अपेक्षा अधिकच उंचावल्या आहेत.

माजी आरोग्यमंत्री असल्याने सुरेश शेट्टी यांचं मंत्रालयात आजही दांडगा संपर्क आहे आणि सर्वच पक्षातील नेते मंडळींशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने या विषयाला मोठा प्रमाणावर वाचा फोडली जाऊ शकते. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भेटीनंतर नेमका कोणता तोडगा निघणार ते बघावं लागणार आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Congress(237)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या