29 March 2024 4:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

ईशान्य मुंबई: मतदारांनी भाजप उमेदवार प्रवीण छेडा व किरीट सोमैयांना सुनावलं

Peoples opposed BJP Candidate Manoj Kotak during loksabha campaign at Ghatkopar

मुंबई : ईशान्य मुंबई’मधील लोकसभा आधीच किरीट सोमैया आणि शिवसेनेतील वादातून चर्चेत आली असताना आता स्थानिक मतदाराचा रोष देखील भाजप उमेदवाराला सहन करावा लागत आहे. भाजपचे उमेदवार मनोज कोटक आणि किरीट सोमैया घाटकोपर येथे प्रचाराला आले असता स्थानिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरल्याचे पाहायला मिळाले.

मतदारसंघातील स्थानिक लोकांनी भर रस्त्यात धारेवर धरल्याने ही भाजप उमेदवारासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना भाजपचा गड असलेल्या मुलुंड परिसरात देखील प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. एकाबाजूला भाजप उमेदवार मनोज कोटक यांच्या अपेक्षा गुजराती मतदारावर अवलंबून असताना दुसऱ्याबाजूला एनसीपीचे उमेदवार संजय दीना पाटील यांना मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाज आणि प्रत्यक्ष गुजराती समाजाचा एक गट देखील सर्मथन देताना दिसत आहे.

तसेच स्थानिक शिवसेनेचे काही गट आणि मनसेचे कार्यकर्ते देखील संजय दीना पाटील यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. त्यामुळे सध्याच्या ईशान्य मुंबईतील हालचाली या राष्ट्रवादीसाठी आशादायी आहेत, तर भाजपसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे.

व्हिडिओ: काय घडलं भाजपच्या प्रचारादरम्यान नक्की?

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x