13 December 2024 5:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
x

पक्ष मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन झाला, पण एकाचाच उद्धार झाला - भाजप

CM Uddhav Thackeray, BJP MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, १२ मे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे किती संपत्ती आहे, याबाबत वारंवार उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाला अखेर उत्तर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्न आणि संपत्तीचे तपशील दाखल केले आहेत. त्यानुसार ठाकरे यांच्याकडे १४३ कोटी २० लाख ७४ हजार ७६३ रुपयांचे उत्पन्न दाखवलं आहे.

एवढी संपत्ती असलेल्या ठाकरे यांचा व्यवसाय काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ठाकरेंनी आपल्या प्रतिज्ञापत्र सेवेतून मिळणारे वेतन, व्याज, लांभाश, शेअर्समधून मिळणारे उत्पन्न आदी उत्पन्नाचे स्त्रोत दाखवले आहेत. तर रश्मी ठाकरे या व्यवसाय करत असल्याचं नमूद करण्यात आलंय.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आजवर कोणतीही निवडणूक लढवली नसल्याने ठाकरे कुटुंबाची संपत्ती किती हा उत्सुकतेचा विषय होता. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी उमेदवारी अर्जाबरोबर दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी आपली एकूण संपत्ती ११ कोटी ३८ लाख असल्याचे नमूद केले होते. संपत्तीचे विवरण देताना आदित्य यांनी बँकेमध्ये १० कोटी ३६ लाख रुपये असल्याचे म्हटले होते. तर त्याचबरोबर बॉण्ड शेअर्समध्ये २० लाख ३९ हजारांची गुंतवणूक, सहा लाख ५० हजार रुपयांची एक बीएमडब्ल्यू गाडी असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले होते. आदित्य यांनी आपल्याकडे ६४ लाख ६५ हजारांचे दागिने असून इतर संपत्ती एकूण १० लाख २२ हजारांची असल्याचे यांनी जाहीर के ले होते.

दरम्यान, यावरून भाजपच्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलं आहे. भाजपचे मुंबईतील आमदार अतुल भातखळकर यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीवरून त्यांना लक्ष करताना त्यांनी म्हटलं आहे की, “पक्षाची स्थापना मराठी माणसाच्या उद्धारासाठी झाली होती. एकाचा उद्धार झाला असल्याचे आज उघड झाले आहे, त्यामुळे पुन्हा एकदा अभिनंदन” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे.

 

News English Summary: The party was formed for the salvation of the Marathi people. It has been revealed today that one has been rescued, so congratulations once again said BJP MLA Atul Bhatkhalkar.

News English Title: BJP MLA Atul Bhatkhalkar criticized chief minister Uddhav Thackeray over assets worth rupees 143 crore News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x