15 December 2024 5:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

शेतकरी आंदोलन देशभर जाणार | एनडीए’तून बाहेर पडलेले पक्ष उद्धव ठाकरे आणि पवारांच्या भेटीला

CM Uddhav Thackeray, Shiromani Akali Dal, Farmer protest, Modi government

मुंबई, ६ डिसेंबर: ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.

“मोदी सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत” अशी प्रतिक्रिया खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (MP Premsingh Chandu Majra) यांनी यावेळी दिली. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले.

“राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची देखील आम्ही आज भेट घेणार आहोत, परंतु ती झाली नाही तर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. त्या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल हे करणार आहेत” अशी माहितीही माजरा (The meeting will be chaired by Shiromani Akali Dal chief Prakash Singh Badal) यांनी दिली.

दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होणार (Shiv Sena will participate in the coordination meeting in Delhi) आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणार असल्याचं सांगितल्याची माहिती माजरा यांनी दिली. शरद पवारांपासून ममता बॅनर्जीपर्यंत अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ही बैठक पुढील दोन महिन्यात होणार आहे.

 

News English Summary: The two parties out of the NDA seem to be uniting. Shiromani Akali Dal vice president and MP Prem Singh Chandumajra arrived in Mumbai to meet Chief Minister Uddhav Thackeray. The meeting took place at the Chief Minister’s official residence ‘Varsha’. Shiv Sena has supported all the agitations of the farmers and will also participate in the coordination meeting in Delhi.

News English Title: Chief Minister Uddhav Thackeray support to Shiromani Akali Dal in farmer protest against Modi government News updates.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x