19 April 2024 6:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

माध्यमांवर पोलखोल होऊनही शिंदे म्हणाले, इथे एकही व्यक्ती पैसे देऊन आणलेली नाही, खुर्च्यांवर बसलेले सुद्धा हसले असावेत असे शिंदेंचे दावे

CM Eknath Shinde

TCM Eknath Shinde | दसरा मेळाव्यातल्या सभेमध्ये शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवरही निशाणा साधला आहे. “ज्यावेळेला शिवसेनेत गद्दारी केली. होय गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिपकलेली असली तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मी तरी पुसून पुस्ता येणार नाही”, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर बाण मारला. विशेष म्हणजे या मेळाव्याला शिवतीर्थावरील ऐतिहासिक जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा झाला. शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्याचवेळी बीकेसी ग्राऊंडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ठाकरे कुटुंबातील अनेकांनी हजेरी लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी लांबलचक भाषण केले. यावेळी शिंदे यांचं ऐतिहासिक रटाळ भाषण सुरू असताना अर्ध्याहून अधिक लोक निघून गेल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे.

एकनाथ शिंदे यांचे भाषण वेळेपेक्षा जास्त लांबल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकांनी उशीर होत असल्यामुळे सभेतून काढता पाय घेतला. यापूर्वी शिंंदे गटाने परराज्यातून सभेसाठी माणसे आणल्याची चर्चा होती. तसे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला बाप चोरणारी टोळी निर्माण झाली म्हणता . अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण?”

तसेच बीकेसीत आलेल्या लोकांवर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. येथे लोकं स्वतःहून आले आहेत आणि ही लोकं पैसे देऊन आणलेली नाहीत असं वक्तव्य शिंदेंनी भाषणात केले. मात्र प्रसार माध्यमांच्या कामेरीवर लोकांना पैसे दिले गेल्याच आधीच स्पष्ट झालं होतं. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची समाज माध्यमांवर खिल्ली उडवली जातं आहे. तसेच अनेकांनी असं म्हटलं आहे की, “खुर्चीवर बसलेले लोकं सुद्धा म्हणाले असतील ‘किती खोटं बोलतात’ अशा फिरकी घेणाऱ्या टिपण्या सुरु झाल्या आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: CM Eknath Shinde statement at Mumbai BKC rally check details 06 December 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x