13 December 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
x

राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा भाजपाचा नेहमीच प्रयत्न राहिला - सचिन सावंत

Congress spokesperson Sachin Sawant, BJP Party, Temples reopen

मुंबई, १७ नोव्हेंबर: कोरोना आपत्तीच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मंदिरं तसेच इतर धर्मियांची प्रार्थना स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कोरोनाचा धोका टळला नसला तरी सामान्य लोकांच्या मनातील भीती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. दरम्यान, अनलॉक ५ ची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर राज्य जवळपास पूर्णपणे अनलॉक झालं आहे. त्याला अपवाद केवळ मुंबई लोकल राहिली असून ती सर्वांसाठी खुली झालेली नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं खुली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे.

त्यामुळे काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे. भारतीय जनता पक्षाने राजकारणासाठी देवाला देखील सोडलं नाही. त्यांनी देवालासुद्धा राजकारणाच्या आखाड्यात ओढलं,” अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर केली. ते मुंबईत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.भारतीय जनता पक्षाच्या मनात देवाविषयी भक्तीभाव नाही. परंतु, राजकारणाच्या आखाड्यात देवाला ओढण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष नेहमीच करत राहीला आहे,” असं सावंत म्हणाले. तसेच, कोरोना संकट अजून टळलेले नाही. त्यामुळे जनतेने आपली काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. राज्यातील सर्व मंदिरं सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. त्यानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिरं सुरु करता येतील अशी घोषणा केली. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर आता राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळं सुरु झाली आहेत. ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे काहींनी स्वागत केले. तर मुख्यमंत्र्यांना हे उशिराने सुचलेलं शहाणपण आहे, असं म्हणत विरोधकांनी सरकारवर टीका केली. त्यानंतर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत भारतीय जनता पक्षाविरोधात आक्रमक झाले आहेत.

 

News English Summary: BJP has not left God for politics. He even dragged God into the arena of politics, ”said Congress spokesperson Sachin Sawant. He was talking to media representatives in Mumbai. BJP has no devotion to God. However, the BJP has always been trying to drag God into the arena of politics, ”said Sawant. Also, the Corona crisis is not over yet. Therefore, he appealed to the people to take care of him.

News English Title: Congress spokesperson Sachin Sawant criticized BJP Party over Temples reopen news updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x